बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ असलेले वॉरेन बफे हे गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. “ओरॅकल ऑफ ओमाहा” म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे हे एक प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती, गुंतवणूकदार आणि फिलांथ्रोपिस्ट आहेत. वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवेमधील गुंतवणुकीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या संपत्ती आणि गुंतवणुकीच्या सवयींमुळे त्यांची अनेक वेळा चर्चा झाली आहे आणि पुन्हा एकदा त्यांची ही अनोखी सवय चर्चेत आली आहे. वॉरेन हे रोज ५ कॅन कोक पितात आणि रोज मॅक्डोनल्ड्सचे पदार्थ खातात. जंक फूड हे आरोग्यासाठी चांगले नाही, ते खाऊ नये असे डॉक्टर नेहमी सांगतात. डॉक्टर जे खाऊ नका सांगतात तेच वॉरन बफे खातात. असे असूनही ९३ वर्षाचे वॉरन बफे अगदी ठणठणीत आहेत. काय आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य? असा प्रश्न अनेकांना पडतो.

अलीकडेच सीएनबीसीच्या “स्क्वॉक बॉक्स”या कार्यक्रमात बोलताना वॉरेन बफे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. ते म्हणाले “मला हवे ते खायला मिळावे यासाठी माझ्या आयुष्यातील एक वर्ष कमी झाले तरी मला चालेल. जर कोणी मला म्हटले की मी आयुष्यभर ब्रोकोली आणि काही आरोग्यदायी गोष्टी सोडून इतर काहीही(जंक फूड) न खाल्यास मी एक वर्ष जास्त जगेन; तर मी म्हणेन की माझ्या आयुष्यातील हे जास्तीचे एक वर्ष काढून टाका आणि मला जे खायला आवडते ते खाऊ द्या.”

वॉरेन बफे यांना कोक खूप आवडतो! २०१५ मध्ये फॉर्च्यूनला माहिती देताना कबूल केले की ते दिवसाला ५ कॅन कोक पितात. “मी one-quarter Coca-Cola आहे” असेही ते विनोदी शैलीत म्हटले होते.

बफेने सांगतात, “मी दररोज नाश्त्यासाठी मॅकडोनाल्ड्समध्ये जातो आणि दोन सॉसेज पॅटीज(एक सॉसेज, एक अंडे), एक चीज मॅकमफिन किंवा किंवा बेकन, अंडे, चीज बिस्किट यापैकी एक पदार्थ रोज खातो.

बफे यांचे जुने मित्र असलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी २०१६ मध्ये एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “बफे बहुतेक वेळा कोक पितात आणि आईस्क्रीम आणि हॅम्बर्गर खातात. गेट्स यांनी बफे यांच्याबाबत एक मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले की, एकदा बफे माझ्या घरी राहण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी ऑरीओ बिस्कीटचे संपूर्ण पॅकेट खाल्ले होते.

बफे सांगतात की “मी सहा वर्षांचा होतो तेव्हाच मला काय खायला आवडते हे मला समजले होते.”

वॉरेन बफे यांना वाटते की, आनंदी राहणे हे दीर्घायुष्याचे गुरुकिल्ली आहे आणि त्यांना हॉट फज संडे(hot fudge sundaes) आणि कोका-कोला सारख्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतरच त्यांना खरा आनंद मिळतो!

Story img Loader