जेव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करणार असाल तेव्हा तुम्हाला त्याची खूप आधीपासून तयारी करावी लागते आणि अनेक गोष्टी टॉप सिक्रेट ठेवाव्या लागतात. मात्र, प्रपोज करताना कोणी तुम्हाला डिस्टर्ब केले तर सारे सरप्राईज वाया जाते. दुर्दैवाने, एका जोडप्याचा सर्वात अविस्मरणीय क्षण उध्वस्त झाला जेव्हा डिस्नेलँडच्या कर्मचाऱ्याने मनोरंजन पार्कमध्ये प्रपोजलमध्ये गोंधळ घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करणार होता. यावेळी हा माणूस अंगठी धरून गुडघ्यावर बसलेला दिसतो. डिस्नेलँडचा कर्मचारी येईपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले होते. स्टेजच्या मध्यभागी येताच कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीच्या हातातील अंगठी हिसकावून घेतली आणि जोडप्याला खाली येण्यास सांगितले. तरुणाने या कर्मचाऱ्याला विनंती केली, मात्र त्याने ऐकले नाही. ‘तुम्ही या ठिकाणी न जाता बाहेर जाऊन हे करा’, असे त्यांने या जोडप्याला सांगितले.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ

व्हायरल क्लिप मूळत: Redditor Wasgehtlan ने पोस्ट केली होती, ज्याने सांगितले की तो व्हिडीओमधील व्यक्तीला ओळखतो. युजरने पोस्टमध्ये लिहिले की, ‘डिस्नेलँडच्या कर्मचाऱ्याने माझ्या बेस्ट फ्रेंडचा महत्त्वाचा क्षण खराब केला.’ कर्मचाऱ्याने त्यांना आधी परवानगी मागण्यास सांगितले. तथापि, डिस्नेलँडने या जोडप्याची माफी मागितली आणि ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.

डिस्नेलँडच्या प्रवक्त्याने न्यूजवीकला सांगितले की, “हे प्रकरण जसे हाताळले गेले याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, आम्ही जोडप्याची माफी मागितली आहे आणि ती दुरुस्त करण्याची ऑफर दिली आहे.” गेल्या वर्षी, एका आईने आपल्या मुलाला प्रपोज करताना अडवणूक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.