दिवाळीचा सण म्हणजे फराळाच्या मेजवाणीसह नवीन कपडे खरेदी करण्याचा जणू उत्सवच. हा सण आता जसा जसा जवळ येत आहे प्रत्येकजण शॉपिंगसाठी सज्ज होताना दिसतोय. बाजारपेठा नव्या कपड्याने बहरताना दिसत आहेत. आजच्या घडीला सर्वच रेडिमेड कपडे खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसतात. पण हे नवे कोरे कपडेही आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरु शकतात. बऱ्याच जणांना नवीन कपडे न धुता परिधान करण्याची सवय असते. ही सवय तुमच्या आनंदावर विरजन पडू शकते. कपडे निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने संशोधनातून नवीन कपडे नेहमी धुवून वापरणे गरजेचे असते, असे म्हटले आहे. कपड्यांची निर्मिती करणाऱ्या आणि त्यावर संशोधन करणाऱ्यांच्या मते, कपडे खरेदी केल्यानंतर ते धुणे फार गरजेचे असते. ज्यावेळी तुम्ही नवे कपडे खरेदी करुन घरी आणता त्यावेळी त्या कपड्यांसोबत काही किटाणूही घरी आणता.
कपड्यांच्या दुकानामध्ये अनेकांनी ते कपडे ट्रायल रुममध्ये घालून पाहिलेले असतात. यावेळी ते कपडे घालून पाहणा-या ग्राहकांचा घामही कपड्यांना लागतो. शॉपिंगसाठी आलेल्यांनी अनेकांनी हे कपडे ट्राय केलेले असतात. यापैकी एखाद्याला त्वचेसंदर्भात आजार असेल तर तो या कपड्यासोबत निरोगी माणसाला रोगी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दरम्यानही केमिकलचा वापर करण्यात येतो. यामुळे कपडे खरेदी केल्यानंतर ते तात्काळ परिधान करु नका तर धुवून परिधान करा. नवीन कपडे खरेदीनंतर ती परिधान करुन सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी काळजी घेणे हे देखील महत्त्वाचे आहे.

Story img Loader