टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेचा पुरेपुर वापर थायलँडमधल्या मठाने केला आहे. मंदिर हे पवित्र ठिकाण आहे. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात दारू किंवा दारुच्या बाटल्या घेऊन येणे हे निषिद्ध मानले जाते पण थायलँडमधले ‘वाट पा महा चेडी केवी’ मंदिर हे चक्क दारूच्या बाटल्यांपासून बनवले आहे. लक्षावधी दारूच्या बाटल्या वापरून या मंदिराची इमारत बनवली आहे.

VIRAL : कुत्र्याच्या समाधीची पूजा करण्याची अनोखी प्रथा

थायलँडमधील ‘वाट पा महा चेडी केवी’ हे मंदिर पूर्णपणे दारूच्या बाटल्यांपासून बनवण्यात आले आहे. दारूच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन थायलँडमधल्या बौद्ध भिक्क्षूंनी आधी मठाची एक इमारत बांधली होती. नंतर त्यांनी पुढे या आवारात अशा अनेक इमारती बांधल्या. हे मंदिर ‘ग्रेट ग्लास पगोडा’ या नावाने ओळखले जाते. पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी येथे नेहमीच गर्दी करतात. मठाच्या छप्परापासून ते येथील शौचालये देखील काचेच्या बाटल्यांपासून बनवली आहेत. थायलँडमधली या मठाला पर्यटकांची जास्त पसंती आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हिरव्या आणि तपकिरी रंगांच्या काचेच्या बाटल्यांपासून बनवलेले हे मंदिर फारच मोहक दिसते.

वाचा : ‘या’ गावाने देशाला दिले सर्वाधिक आयपीएस, आयएएस अधिकारी

१९८४ मध्ये या मंदिराची इमारत बांधण्यासाठी काचेच्या बाटल्या गोळ्या करण्यात आल्या. हे मंदिर बनवण्यासाठी दोन वर्षे लागली. त्यानंतर या मंदिराच्या इतर इमारतींचे बांधकांम करण्यात आले.

वाचा : दानशूर भिकारी; देवाच्या चरणी अर्पण केला चांदीचा मुकुट

 

Story img Loader