दुचाकीस्वाराने हेल्मेट न घातल्याने त्याचे चलान कापल्याने पोलीस आणि दुचाकीस्वारामध्ये वाद झाल्याचे अनेक किस्से आपण ऐकतो. मात्र उत्तर प्रदेशमधील मेरठमधील पोलीस होम गार्ड आणि दुचाकीस्वारामध्ये हेल्मेट घालवण्यावरुन झालेला वाद कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून यामध्ये पोलीस होम गार्ड आणि दुचाकीस्वारामध्ये झालेली हाणामारी दिसून येत आहे.

व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे पोलीस होम गार्डने दुचाकीस्वाराला हेल्मेट न घातल्याबद्दल आडवले. त्यावेळी या दुचाकीस्वाराने ‘तुला माझी गाडी थांबवण्याचा अधिकार नाही’ असे उद्धट उत्तर दिले. यावरुन संतापलेल्या पोलीस होम गार्डने या व्यक्तीच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर या होम गार्डने दुचाकीस्वाराला कानाखाली मारण्याचाही प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संतापलेल्या दुचाकीस्वाराने मग या होम गार्डवरच हल्ला केला. नक्की काय झाले तुम्हीच पाहा…

उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करुन हे ट्विट करण्यात आले आहे. यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठ पोलिसांना टॅग करुन सबंधित प्रकरणामध्ये माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश ट्विटवरुनच दिले आहेत. मात्र थेट नागरिकावर हात उचलणाऱ्या होम गार्डवर तसेच होम गार्डला पायातली स्लिपर काढून मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारावर पोलिसांनी काय कारवाई केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader