इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. तसा इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा संघर्ष मागील अनेक वर्षांपासून चालत आला आहे. मात्र सोमवारपासून जुन्या जेरुसलेम शहराजवळ दोन्ही बाजूने हल्ले केले जात आहेत. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि अर्मेनियन लोकांसाठी महत्वाचं धार्मिक स्थळ असणाऱ्या या ठिकाणाला आता जवळजवळ युद्धभूमीचं स्वरुप आलं आहे. मध्य पूर्व आशियामध्ये उफाळून आलेल्या या संघर्षामागे काही तात्कालीन कारणंही आहेत. सोमवारपासून हमासने इस्रायलवर १६०० हून अधिक रॉकेट्स डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला आहे. यापैकी ४०० रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडली. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे शंभर रॉकेट्स आकाशातच निकामी केले. आयर्न डोम ही इस्रायलची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे हाणून पाडण्याची प्रणाली आहे. २०११ पासून ही यंत्रणा उपयोगात आहे. या यंत्रणेने कशापद्धतीने हमासने केलेला हल्ला परतवून लावला यासंदर्भातील व्हिडीओ इस्रायलमधील सुरक्षा यंत्रणांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा