योगगुरू बाबा रामदेव त्यांच्या योग्याभ्यास आणि जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचा नवा व्हिडिओ समोर आला ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ योग्याभासबाबत नाही तरवेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहेत. योग गुरू बाबा रामदेव यांचे वय सध्या ५९ आहे आणि या वयातही ते इतके तंदुरुस्त आहे की, “सुसाट धावणाऱ्या घोड्याला देखील मागे टाकू शकतात.” तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंच घडले

व्हायरल व्हिृडीओमध्ये आपल्या फिटनेसचे प्रदर्शन करत बाबा रामदेव यांनी घोड्याबरोबर धावताना दिसत आहे. व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे आणि व्हि़डीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती घोड्यावर बसून त्याला नियंत्रण ठेवतो आहे. घोडा धावतो आहे आणि त्याच्या बरोबर बाबा रामदेव देखील धावत आहे. एक रोमांचक वळण येते जेव्हा बाबा रामदेव घोड्यापेक्षा वेगात धावतात आणि चक्क घोड्याला मागे टाकतात आणि शेवटी ते थांबतात. या घोड्यांबरोबर शर्यत करून ते त्यांच्या योगाची शक्ती दर्शवतात. या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचजे लक्ष वेधले आहे. केवळ अडीच तासांत ५८,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे केवळ बाबा रामदेव यांच्या प्रचंड लोकप्रियतेला दर्शवत नाही तर फिटनेस आणि योगामध्ये लोकांची वाढती आवड देखील दर्शवते.

या व्हिडिओमुळे अनेक प्रेक्षकांना प्रेरणा मिळाली आहे. काहींनी मजेशीर कमेंट केल्यचा आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “ऑलिंपिकमध्ये चला बाबा.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “घोड्यांवर नियंत्रण ठेवता येते, पण बाबाजींवर नियंत्रण ठेवता येत नाही.” तिसऱ्या वापरकर्त्याने विनोद केला, “येणाऱ्या ऑलिंपिकमध्ये बाबा नक्कीच सुवर्णपदक मिळवतील.” “ये अमर होऊनच राहितील.” असे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले. एका नेटिझनने म्हटले, “बस करो बाबाजी…चुकून पाकिस्तानची सीमा ओलांडाल.”

योगाचे कौशल्य दर्शवण्याशिवाय बाबा रामदेव त्यांच्या पतंजली आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रचार केला आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ते थेट रुग्णांशी संवाद साधतात, मार्गदर्शन आणि सल्ला देतात. योग आणि आयुर्वेदाचा स्वीकार करणे ही निरोगी आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहे. असे सांगतात.

Story img Loader