मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणतात. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे जिथे लाखो लोक रोजगार मिळवण्यासाठी किंवा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबई शहरात राहणे काही सोपी गोष्ट नाही. मुंबई आणि मुंबईकर लोक सतत धावत असतात, कधी आपल्या स्वप्नांच्या पाठीमागे नाहीतर लोकल पकडण्यासाठी. मुंबईत राहायचं असेल तर तुम्हाला लोकलने प्रवास करण्याची तयारी आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. कारण मुंबई लोकलने प्रवास करणे आजिबात सोपे काम नाही. प्रवाशांची तोबा गर्दी, धक्काबुक्की सर्वकाही सहन करत लोकलमध्ये चढणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जगावे लागते. मुंबई लोकलच्या प्रवासाचे अंगावर काटा आणणारे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच काही कष्टकरी महिलांचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

कष्टकरी महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

व्हायरल व्हिडीओमध्ये काही कष्टकरी महिला डोक्यावर भारा घेऊन उभ्या आहेत, लोकल स्टेशनवर थांबण्याआधीच एक महिला डोक्यावरील भारा उतरवून लोकलमध्ये टाकते. स्टेशनवर आणखी काही महिला भारा घेऊन उभ्या असलेल्या दिसतात. जशी लोकल थांबते तशा पटापट वाऱ्याच्या वेगाने ते एक एक भारा उचलून लोकलमध्ये टाकतात आणि काही महिला पटकन ट्रेनमध्येही चढतात. लोकल फक्त काही सेंकदासाठी स्टेशनवर थांबते पण तेवढ्या वेळातही महिलांनी आपलं काम झटपट पूर्ण केले. अशा कामासाठी आधीपासून तयारी करावी लागते आणि प्रत्येक व्यक्तीला वेगात हालचाली कराव्या लागतात. या कष्टकरी महिलांचा हा व्हिडिओ पाहून अनेक लोक थक्क झाले आहे.

हेही वाचा – रात्रभर वीज पुरवठा बंद! मिक्सर आणि मोबाईल चार्जर घेऊन थेट महावितरण कार्यालयात पोहचले संतापलेले ग्राहक, Viral Video एकदा बघाच

हेही वाचा – “माणसांना पंख असते तर…? चिमुकल्याच्या ‘या’ निबंधाला तुम्ही किती मार्क्स द्याल? Viral Photo पाहून पोट धरून हसाल

मुंबई म्हणजे घड्याळावरचं जगणं

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुंबई म्हणजे घड्याळावरचं जगणं आहे. मुंबईतील प्रवास अगदी वेळेवर असावा लागतो. इथे एक ट्रेन पकडण्यासाठी भर भर धावावे लागते कारण ट्रेक चुकल्यावर एक एक मिनिटांची किंमत समजते.”

हेही वाचा –“हौसेने आणली ती चारचाकी घरी पण मायबाय रस्त्यावरी…” हरिनाम जपत तरुणाने गायलं भन्नाट मराठी रॅप! Viral Video एकदा बघाच

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक मुंबईकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “महिलांचे वर्किंग स्किल किती परफेक्ट आहे. फक्त ३० ते ३५ सेकंदात केवढे ओझे लोकलमध्ये ठेवले.

दुसरा म्हणाला, “मुंबई आपला जीव आहे”