“काळ आला होता पण वेळ आली नव्हती”, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल पण दोन महिलांच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली आहे. सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण त्यापैकी काही व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.
मृत्यूच्या दाढेतून माघारी आलेल्या महिलांचा व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळ (टीएनएसटीसी) बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरधाव वेगात बस थेट एका दुकानात शिरली. दरम्यान या दुकानसमोर उभी असलेली आणि दुकानाच्या आत असलेली महिला थोडक्यात बचावली आहे. तमिळनाडूच्या दिंडीगुल परिसरात ही घटना घडली. हा अपघातात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
@karthigaichelvan ने इंस्टाग्रामवर शेअर केलेला, व्हिडिओला सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये भरधाव वेगात येणारी बस थेट दुकानात घुसलेली दिसत आहे. दुकानात काम करत असलेली महिला कामात व्यस्त होती तेवढ्यात तिला मोठा आवाज होतो म्हणून ती दुकानाबाहेर पाहते तर एक मोठी बस दुकानाच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसते. ती महिला तेथून पळ काढणार त्यापूर्वीच बस दुकानाला धडकते पण सुदैवाने महिलाला दुखापत होत नाही. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर दुकानाबाहेर एक ग्राहक महिला उभी असलेली दिसत आहे. बसच्या धडक्याच्या फक्त एक सेकंद आधी बाजूला सरकते आणि थोडक्यात वाचते. व्हिडीओमधील हा क्षण पाहताना अंगावर काटा येईल. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एकाने लिहिले, “देवाचे आभार, ती सुरक्षित आहे आणि ती महिला ताबडतोब तिथून निघून गेली याचा आनंद आहे.” दुसरा म्हणाला, “चांगली गोष्ट त्यांना काहीही झाले नाही.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ती महिला योग्य वेळी निघून गेली.”
दुकानातील महिला जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टीएनएसटीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “द हिंदूमधील वृत्तानुसार हा अपघात मानवी चुकांमुळे झाला आहे. बस थेणीकडे निघाली असताना चालकाने रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे त्यात म्हटले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की चालकाच्या “निष्काळजी वृत्तीमुळे” अपघात झाल्यापासून त्याच्याविरूद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे, अहवालात नमूद केले आहे.