मेट्रो प्रवासातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी मेट्रोमध्ये कोणी डान्स करताना दिसते, कधी कोणी स्टंट करताना दिसते तर कोणी भांडताना दिसतात. पण मेट्रोमध्ये जिवंत खेकडे तुम्ही कधी पाहिले आहेत का? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. मेट्रोमध्ये जिवंत खेकडे पसरल्याने प्रवाशांची धांदल उडाल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ भारतातील नसून परदेशातील मेट्रोमध्ये घडला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ न्युयॉर्कमध्ये घडला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेची प्लास्टिक पिशवी फाटल्यामुळे त्यातील खेकडे बाहेर पडले ज्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पुढे काय घडले ते जाणून घेण्यासाठी व्हायरल व्हिडिओ पाहा.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला चक्क जीवंत खेकडे घेऊन मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. पण अचानक महिलेच्या हातातील पिशवी फाटली अन् सर्व खेकडे मेट्रोमध्ये पसरले. काही क्षण प्रवशांमध्ये गोंधळाचे वातवरण झाले पण अनेकांनी महिलेची मदत केली. काहींनी महिलेला पिशवी दिली तर काहींनी घाबरत घाबरत खेकडे पकडून पिशवीमध्ये टाकले.
व्हायरल व्हिडिओ @subwaycreatures नावाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, “महिलेच्या पिशवीतील खेकडे मेट्रोमध्ये पसरले”
येथे पाहा Viral Video
हेही वाचा – पुणेरी आजोबांचा नादखुळा! स्टेजवर चढून हवेत काठी घेऊन बिनधास्तपणे नाचले आजोबा! Viral Video एकदा बघाच
व्हिडिओने 22 दशलक्षाहून अधिक दृश्ये एकत्रित केली आहेत आणि असंख्य प्रतिक्रियांना सूचित केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “एशियन काकांनी कसलीबी भिती न बाळगता खेकडे हातात पकडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भितीचे हावभाव आणि भावना दिसत नाही.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “मला खात्री आहे की, जो कोणीही आशियाई माणूस न घाबरता खेकडे धरतो तो प्रमाणित सीफूड प्रेमी आहे.”
जून २०२३ मध्ये दिल्ली मेट्रो ट्रेनच्या डब्यात माकड घुसले, त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.