रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे रुळ अशा ठिकाणी वावरताना नेहमी सावधगिरी बाळगावी लागते अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते. तरीही अशा ठिकाणी लोक बेशिस्तपणे वावरताना दिसतात. धावत्या रेल्वेमध्ये चढणे, दारात बसून अथवा उभे राहून प्रवास करणे, रेल्वेमध्ये अथवा स्टेशनवर डान्स करत रिल्स शुट करणे किंवा स्ंटट करणाऱ्यांचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे लोक फोटो व्हिडीओसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत असतात. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला फोटो काढण्यासाठी रेल्वे रुळाजवळ थांबलेली दिसते. तेवढ्यात मागून रेल्वे येते.. पुढे जे घडतं त्याची कल्पना कोणीही केली नसेल.
UNILAD Tech ने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, रुळाजवळ थांबून एक महिला फोटो काढताना दिसत आहे. मागून रेल्वे येत असतानाही महिला स्वत:चा जीव धोक्यात घालून तेथेच उभा राहून फोट काढत आहे. जशी रेल्वे जवळ येते तसा त्या रेल्वेच्या इंजिनच्या दारात उभा असलेला लोको पायलटने या महिलेला जोरात लाथ मारतो आणि बाजूला ढकलतो. ही महिला धोकादायकरीत्या रेल्वे रुळांजवळ थांबली होती. जवळ येणाऱ्या रेल्वेकडे दुर्लक्ष करत महिला फोटो काढताना दिसत आहे. रेल्वे तिच्या जवळ येऊनहीती हलत नाही. त्या क्षणी, लोको पायलट तिला वेळेवर रुळांवरून लाथ मारून बाजूला करतो. महिलेला बाजूला हटवले नसते तर तिला चालत्या रेल्वेची जोरदार धडक बसली असती त्यामुळे लोको पायलटने महिलेला लाथ मारून संभाव्य दुर्घटना टाळली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! भररस्त्यात विवस्त्र फिरत होती महिला, Video होतोय Viral
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही लोक त्यांच्या आजूबाजूच्या जगाबद्दल गाफील असतात.” महिलेचा फोटो काढणाऱ्या व्यक्तीने तिला सावध का का केले नाही, असा प्रश्न सोशल मीडिया वापरकर्त्यांना पडला.
महिलेला वाचवण्यासाठी तत्परतेने काम करणाऱ्या रेल्वे चालकाचे या व्हिडिओचे सर्वत्र चर्चा होत आहे. दुसरीकडे, महिलेला रेल्वे रुळांजवळ सावधगिरी न बाळगल्याबद्दल तीव्र टीकेला सामोरे जावे लागले.
एकाने म्हटले, “त्या ट्रेन ड्रायव्हरने तिचा जीव वाचवला असावा.” दुसरा म्हणाला, “त्याचा पाय तिला स्पर्श करू शकतो.. ती नक्कीच खूप जवळ आहे!!” दुसऱ्या युजरने लिहिले, “तो फोटो काढणारा माणूस ट्रेनच्या समोर उभा आहे आणि त्याने तिला चेतावणी का दिली नाही?”