लखनौच्या सीतापूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्यांमध्ये एक रिक्षा पलटताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रशासनातील लोकांच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे. हा अपघात घडताना डीएम-एसपींच्या ताफा बाजूने जात होता. मात्र, त्यापैकी कोणीही वाहन थांबवून चौकशी करण्याची तसदी घेतली नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी तुडुंब भरले आहे. समोरून डीएम-एसपी आणि पोलिसांची गाडी येत होती. पलीकडून एक ई-रिक्षा येत होती. खड्ड्यांमुळे ई-रिक्षाचा वेग थांबतो आणि रिक्षा सरळ खड्ड्यात अडकते. तिथेच त्याचा तोल बिघडतो आणि सरळ खाली जातो.

( हे ही वाचा: बस ड्रायव्हरने लढवली भारीच शक्कल! वायपर खराब होताच त्याने केलेल्या जुगडाचा Viral Video एकदा पहाच)

भलमोठ्या खड्यात अशी पडली रिक्षा

( हे ही वाचा: Viral Video: पैसे घेऊन पिझ्झा घ्यायला आलेल्या चिंपाझीला पाहून डिलिव्हरी बॉय पडला बुचकळ्यात! पुढे असं काही घडलं की…)

रिक्षा उलटूनही अधिकाऱ्यापैकी विचारपूस करायला कोणीही थांबलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, मदत करायची नसेल तर किमान माणुसकीच्या नात्याने लोकांचे हित विचारणे गरजेचे आहे. एका ट्विटर यूजरने लिहिले की, अधिकारी आणि सामान्य जनता यांच्यातील हा फरक कोणतेही सरकार दूर करू शकत नाही. अशी बेलगाम नोकरशाही कधी पाहिली नाही. कठोर कारवाईची गरज आहे.

Story img Loader