भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, नैऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अनेक भागात पोहोचला आहे. या वर्षी, मान्सूनने सामान्य आगमन तारखेच्या सहा दिवस आधी संपूर्ण देश व्यापला. दरम्यान राजस्थानच्या काही भागांमध्ये सळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाराने चांगलेच झोडपले आहे. दरम्यान श्री गंगानगरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. प्रवाशांना त्यांच्या कारवर (उच्च विद्युत दाब सुरु असलेला) हाय-व्होल्टेजचा विजेचा खांब पडला पण प्रवाशांचा जीव थोडक्यात बचनावला. वृत्तानुसार, ही घटना २ जुलै रोजी घडली आणि कोणालाही दुखापत झाली नाही.

एका प्रेक्षकाने रेकॉर्ड केलेल्या या घटनेचा व्हायरल व्हिडिओमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहतो आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक पांढरी कार दिसत आहे. शेजारून लाल रंगाच्या कारवर जात असताना अचानक बाजूचा विजेचा खांब कारवर कोसळतो. आधीपासून रस्त्यावर उभ्या असलेल्या पांढऱ्या कारच्या अगदी बाजूलाच ही कार थांहते.मागून येणारा एक स्कूटरवरील व्यक्ती देखील थोडक्यात बचावतो. तो माणूस धोका टाळण्यात लगेच त्याची गाडी मागे घेतो. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसा एक माणूस पांढऱ्या कारमधून बाहेर पळत असून शेडखाली आश्रय घेताना दिसतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch electric pole falls on moving car amid heavy rain in rajasthan passengers escape unhurt snk
First published on: 04-07-2024 at 20:35 IST