Viral video: लग्नात हुंडा देण्याची आणि घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हुंडापद्धत भारतातील एक जाचक आणि महिलांसाठी अन्यायकारक पद्धत आहे. अनेकदा या हुंड्यापायी महिलांचा छळ होतो तर काही जणींचा हुंड्यापायी मृत्यूही झालेला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे, ज्यामध्ये कारपासून स्वयंपाकघरापर्यंत जवळपास सर्वच भांडी भेट म्हणून देण्यात आली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक संतापले आहेत.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका लग्न सुरु असून मंडपात हुंड्यात मिळालेल्या वस्तूंचा अक्षरश: ढीग लागला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाला अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्याचे दिसत आहे. यामध्ये एक SUV कार,स्वयंपाकघरातील वस्तू, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, कप बोर्ड, बेड आणि सोफा यांचा समावेश आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @virahkrsah नावाच्या युजरने शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “आई मला अभ्यास नको फक्त खायला हवं” अभ्यास करुन कंटाळलेल्या चिमुकल्याचा VIDEO व्हायरल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे.