बाप लेकीचं नातं अनोखं असतं. आपली लेक ही बापासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. दोघांचाही एकमेकांवर अफाट जीव असतो. वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे ‘हिरो’च असतात. आपल्या या हिरोसाठी मुलगी काहीही करू शकते. मग ती मुलगी सामान्य कुटुंबातील असो किंवा प्रसिद्ध राजकारणी घराण्यातील. “लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी”. याच ओळी खऱ्या करुन दाखवणाऱ्या आज असंख्य तरुणी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आधार देत आहेत. असाच एक बाप-लेकीच्या नात्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बापासाठी कायपण….
अमेरिकेतील मिसुरीमध्ये एका मुलीने तिच्या आजारी वडिलांना गुपचूप किडनी दान केली. खरे तर वडील बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. मुलीने अनेकवेळा किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण वडिलांना आपल्या मुलीला अडचणीत बघायचे नव्हते, त्यामुळे ते नेहमीत विरोध करायचे. म्हणूनच त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या मुलीला असे करण्यास रोखले होते. मात्र, मुलीचे मन हे मान्य करत नसल्याने तिने वडिलांना कळू न देत किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
मुलीने स्वत:ची किडणी केली वडिलांना दान
वडिलांचे नाव जॉन इव्हानोव्स्की आहे. जॉन यांना किडनीच्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत होता. त्यांना दर दोन दिवसांनी पाच तास डायलिसिस मशिनवर राहावे लागे. त्यांची २५ वर्षांची मुलगी डेलेन हिने त्यांना तिची किडनी दान करण्याची अनेक वेळा विनंती केली, परंतु वडिलांना आपल्या मुलीच्या जीवाला कोणत्याही प्रकारे धोका होऊ नये असे वाटत होते. त्यामुळेच तो प्रत्येक वेळी किडनी दान करण्यास नकार देत होते. ते नेमही म्हणायचे, “तू अजून खूप लहान आहेस. तुला हे आयुष्य खूप काळ जगायचे आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे.”
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: तरुणीने थेट रेल्वे ट्रॅकवरच उभी केली कार; समोरुन वेगात ट्रेन आली अन् क्षणात…
किडनी प्रत्यारोपणाच्या दुसऱ्या दिवशी, डेलेन तिच्या वडिलांना त्यांच्या वॉर्डात भेटायला गेली तेव्हा वडिलांना धक्का बसला आणि ते ढसाढसा रडू लागले. वास्तविक वडील मुलीला किडनी दान करण्यास नकार देत होते कारण १६ वर्षांपूर्वी त्यांनी आपला मुलगा आजारामुळे गमावला होता. आपला मुलगा गमावल्यानंतर जॉनला आपली मुलगी गमावायची नव्हती. याच कारणामुळे ते आपल्या मुलीला किडनी दान करण्यास नेहमीच नकार देतो. किडनी प्रत्यारोपणानंतर जॉन यांना आता बरे वाटत आहे. त्यांनी आपल्या मुलीला मिठी मारली आणि तिचे आभार मानले.