जगात अनेक नाती पुन्हा तयार केले जाऊ शकतात, मात्र आपल्या कुटूंबियांसोबतचं नातं कधीच दुसऱ्यांदा तयार होऊ शकत नाही, असं म्हणतात. जिथे गोष्ट पैशाची असते, तिथे हल्ली तर सख्खे भाऊ सुद्धा पक्के वैरी होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मग यात सामान्य असो वा एखादे मोठे राजकीय नेते मंडळी…सर्वांचं सारखंच असतं. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या बेतिया येथील नरकटियागंजमधल्या भाजप आमदार रश्मी वर्मा आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार रश्मी वर्मा त्यांच्या भाची आणि भावजयींसोबत धक्काबुक्की, शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये आमदार रश्मी वर्मा स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना एक आठवड्यापूर्वीची आहे. नरकटियागंजमधील धनौजी फार्ममध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये आमदार रश्मी वर्मा त्यांच्या नातेवाईकांशी भांडताना दिसत आहेत. आमदार रश्मी वर्मा सध्या केरळमध्ये असल्या तरी गेल्या ४० वर्षांपासून आपल्या भावजयी आणि इतर नातेवाईकांनी त्यांच्या मालमत्तेवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. वारंवार जाऊनही त्यांच्या मालमत्तेचा वाटा त्यांना दिला जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Navneet Ranas controversial statement says people who are bothered by Jai Shri Ram send them to Pakistan
अमरावती : ज्‍यांना ‘जय श्रीराम’ नाऱ्याचा त्रास होतो, त्‍यांना पाकिस्‍तानात रवाना करा; नवनीत राणा यांचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

आणखी वाचा : याला म्हणतात खरी मैत्री! भूकंपाने शाळा हादरली, जीव धोक्यात घालून दिव्यांग वर्गमित्राला वाचवले, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL

आमदार रश्मी वर्मा सांगतात की, मालमत्तेबाबत त्यांच्या नातेवाइकांवर पोलिस स्टेशन आणि कोर्टात अनेक खटले सुरू आहेत. आंब्याच्या बागेतून त्यांना एकही आंबा दिला जात नाही, असं आमदार रश्मी वर्मा यांनी सांगितले. त्यामुळे त्या स्वतः बागेत गेल्या आणि त्याचवेळी तिथे त्यांचे नातेवाईकही त्यांच्या मुलीसह पोहोचले. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये हाणामारी आणि धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर मारहाण आणि धक्काबुक्कीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता हा व्हिडीओ समोर आला आहे. रश्मी वर्मा या पश्चिम चंपारणमधील नरकटियागंज येथील भाजपच्या आमदार आहेत.

Story img Loader