पाणीपुरी असा पदार्थ आहे जो भारतातील जवळपास प्रत्येत व्यक्तीला आवडतो. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात त्याचे वेगवेगळे नाव आहेत, कोणी त्याला पुचका म्हणते तर कोणी गोलगप्पे असेही म्हणते. ही आंबड, गोड आणि तिखट चवीची पाणीपुरी हे लोकांचे आवडते स्ट्रिट फूड आहे. आपल्याला प्रत्येक चौकीत, रस्त्यावर अनेक पाणीपुरी विक्रेते पाहायला मिळतात जे आपला छोटासा स्टॉल लावून पाणीपुरी विकताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का त्यांची कमाई ही कॉर्पोरेटसेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. होय तुम्हाला विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा.

आपल्याकडे ९ ते ६ वेळेत कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे म्हणजे आर्थिक स्थिरतेची गुरुकिल्ली मानले जाते कारण त्यांना चांगला पगार असतो आणि मर्यादित वेळेत काम असते पण आता या वैचारिकतेला आव्हान आता हे पाणीपुरी विक्रेते आव्हान देत आहे. कारण असंघटीत कामगार वर्गातील स्ट्रीट फूड विक्रेते आता कॉर्पोरेटवाल्यांपेक्षा जास्त कमाई करत असल्याचे समोर येत आहे. याची प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे @vijay_vox आणि @college_arena या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये एक पाणीपुरी विक्रेता दिसत आहे ज्याची दिवसाची कमाई ऐकून तुम्ही सर्वजण थक्क होईल.

व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तीचा पाणीपुरी विक्रेत्याची संवाद साधताना दिसत आहे ज्यामध्ये असे समजते ज्याची, रोजची कमाई अनेक पारंपारिक कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त आहे. पोस्टमध्ये मात्र ही व्हिडीओ कुठे शूट करण्यात आली याचा उल्लेख नाही.

हेही वाचा – पाळण्यातील बाळाच्या तोंडावर म्हशीने टाकले शेण; श्वास गुदमरल्याने ६ महिन्याच्या चिमुकल्याचा झाला मृत्यू

व्हिडिओवरून असे दिसून आले आहे की, शहरी भागात पाणीपुरी विक्रेत्यांचे सरासरी दैनंदिन उत्पन्न २,५०० रुपयांपर्यंत मिळू शकते जे महिन्याला साधारण ७५००० रुपये इतके होते आणि वार्षिक उत्पन्न जवळपास ९०, ००० रुपये इतके आहे जे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या पॅकेजपेक्षा जास्त आहे.

भारतीयांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या स्ट्रीट फूड संस्कृतीचा फायदा घेण्यात पाणीपुरी विक्रेते यशस्वी झाला आहे. छोटासा स्टॉल लावून अनेक पाणीपुरी विक्रेते आपला व्यवसाय सहज सुरू करू शकतात. जीर, डांळीब, पेरू, चिंच अशा वेगवेगळ्या चवीचे पाणी अनेक विक्रेत देत आणि तसेच बटाटा, चणा, पांढरा वाटाणा यासारखे वेगवेगळ्या पदार्थांचा रगाडा वापरत आहे. रस्त्यावर मिळाणाऱ्या साध्या पदार्थाची विक्री करून हे लोक यशस्वी व्यवसाय करत आहे.

हेही वाचा- रेल्वे प्लॅटफॉर्म सायकल उलटी पलटी करत केला जबरदस्त स्टंट, श्वास रोखून पाहत राहिले प्रवासी; Viral Video एकदा पाहाच

पाणीपुरी विक्रेत्याची कमाई पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि अनेकांनी त्यांच्या कष्ट आणि मेहनतीचे कौतूक केले आहे तर दुसऱ्याने लिहिले की, “मी त्याच्या महिन्याचे आणि वार्षिक उत्पन्नाचा अंदाज लावत आहे.

Story img Loader