हरियाणामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. पाऊस पडल्यानंतर हरियाणामधील पाण्यावरती जमिनीचा तुकडा हळू हळू वरच्या बाजूला वाढत आहे अर्थात एस्कपांड होत आहे. व्हिडिओमध्ये पाण्यात बुडलेली जमीनीमध्ये अचानक वाढ होत असलेलं बघून पाहणाऱ्या लोकांनाही धक्का बसला. व्हिडिओची सुरुवात पाण्याखालील जमीनीचा तुकडा वर येत होते. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व्यक्तीही या दृश्यावर शॉक व्यक्त केल्याचं ऐकायला मिळते. तो बोलतो “ हे बघा, जमीन कशा पद्धतीने वर उचलली जात आहे. हा ए नवीन अनुभव आहे.” असं बोलत हा व्यक्ती पुढे व्हिडीओ करतच होता. उपस्थितीत लोकांचाही आवाज या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. ते म्हणतात की “परिसरात पाऊस पडल्यामुळे ही विचित्र घटना घडली असावी.”
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
फेसबुकवर शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून आत्तापर्यंत ६.१ दशलक्ष लोकांनी बघितले आहे तर ६१,००० लोकांनी याला पसंत केले आहे. अनेकांनी या विचित्र घटनेमागील कारणांचे अनुमान लावत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अशा घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नाही परंतु अनेक युजर्सने खाली कमेंट केली आहे. टेक्टोनिक प्लेटच्या हालचालींमुळे जमीन वाढू शकते, असे काही युजरचे म्हणणे आहे तर, दुसरा युजर म्हणतो की,“टेक्टोनिक क्रियामुळे खरोखरच हे झाले नाही तर पृथ्वीत अडकलेले मिथेन ओले थर एक बबल तयार होण्यापासून मुक्त झाला, असे दिसते. काही युजर्सने या व्हिडीओला बघून काळजीही व्यक्त केली. अनेकांना तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी होती आणि त्यांच्या नुसार लोकांनी या क्षेत्रापासून दूर जावे.
तुम्हाला या व्हिडीओबद्दल काय वाटत? कशामुळे असं झालं असेलं?