मान्सून सुरू झाल्यापासून, भारताच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी उत्तराखंडमधील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. दरम्यान या थरारक घडनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोंगराचा मोठा भाग कोसळताना आणि रस्त्यावर पडताना दिसत आहे. दरड कोसळ्याने हा मार्ग बंद झाला आहे. जोशीमठमधील चुंडू धार येथे ही घटना घडल्याचे वृत्त आहे. व्हिडिओमध्ये काही पर्यटकांना त्यांच्या मोबाइल फोनवर हा थरारक घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे तर काहीजण घाबरून ओरडत आहेत आणि सुरक्षिततेसाठी धावत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना प्रिया सिंग या एक्स युजरने लिहिले की, “डोंगराचा एक भाग अचानक तुटून वेगळा झाला. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील जोशीमठ येथील आहे.

हेही वाचा – शनिवारी-रविवारी लोणावळ्यातील भुशी धरणावर भेट देण्याआधी ‘हा’ Video पाहा, पर्यटकांची तोबा गर्दी पाहून अंगावर येईल काटा

९ जून रोजी शेअर केलेल्या, व्हिडिओने पावसाळ्यात हिल स्टेशन आणि पर्वतांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला होता. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, “याहून दुःखाची गोष्ट म्हणजे हे सर्व पाहून लोक आनंदी होत आहेत.”

दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, “जोशीमठमध्ये याआधीही भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत! पण सरकारला याची अजिबात जाणीव नाही!”’

हेही वाचा –९ वर्षांच्या चिमुकलीचे गाणे ऐकून आनंद महिंद्राचे डोळे आले भरून, केले तोंडभरून कौतूक; पाहा Viral Video

“विकासाचं पाऊल आता डोंगरावर पडले आणि डोंगर कोसळला आणि विकास रस्त्यावर आला,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चमोली येथे दोन ठिकाणी ढिगारा साचल्याने गेल्या आठवड्यात बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला होता. या अडथळ्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे चंपावत आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. शनिवारी चमोली जिल्ह्यात दरड कोसळल्याने दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch massive landslide in uttarakhand blocks badrinath national highway commuters record live video snk