लहान मुलींना रोज वेगवेगळ्या फॅन्सी हेअर स्टाईल करायला आवडतात. यामुळे मार्केटमध्ये लहान मुलींसाठी अनेक नव्या हेअर ब्रेडिंग टूल मशीन आणि हेअर ज्वेलरी मशीन पाहायला मिळतात. अनेकदा लहान मुलींच्या हेअर स्टाईल मशीनचे व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका हेअर टूल्स मशीनचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांची वेणी बांधू शकता. तसेच यातील दोरी, स्टोन मशीनच्या मदतीने फॅन्सी हेअरस्टाईल करू शकता.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हेअर ब्रेडिंग मशीनने केसांची एकदम परफेक्ट वेणी घातली जाते. यात केसांच्या तीन बटा एक, एक करून मशीनमध्ये ओवल्या जातात, त्यानंतर ही मशीन ऑन होताच पटापट वेणी घातली जाते. यानंतर दुसऱ्या एका मशीनमध्ये दोरी गुंडाळून बॉबिन बसवण्याची सोय आहे. यात टूलच्या मधल्या गोलात थोडे केस अडकवून केसांमध्ये वरून खाली अशी ही मशीन फिरवली जाते. ज्यानंतर केसांच्या बटेवर दोऱ्याचे आडवेतिडवे वेढे दिले जातात. अशाप्रकारे तुम्ही दोऱ्यांनी वेढलेली केसांच्या पाहिजे तितक्या रंगीत बटा घालू शकता.
यानंतर हेअर ज्वेलर मशीनच्या मदतीने केसांवर रंगीत चकाकणारे खडे बसवले जातात. यात केसांची एक एक बट घेऊन त्यावर थोड्या थोड्या अंतरावर हे रंगीत खडे बसवले जातात. अशाप्रकारे तीन-चार प्रकारच्या मशीनने तुम्ही केसांची वेगवेगळ्या प्रकारची हेअर स्टाईल करू शकता. अनेकांना ही मशीन खूप आवडली आहे.
@HasnaZaruriHai या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ज्याला वेणी बांधता येत नाही त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, विनोदाचा भाग सोडा, पण जे वडील एकटे मुलीचा सांभाळ करतात, त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. तर अनेकांनी ही मशीन कुठे मिळते, अशी विचारणा केली आहे.