गिझाचा ग्रेट पिरॅमिड हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.संशोधकांचा असा अंदाज आहे की, गिझाच्या पिरॅमिड्समध्ये चौकोनी आकाराचे २.३ दशलक्ष मोठे दगड आहेत. त्यातील प्रत्येक दगडाचे वजन सरासरी २.३ मेट्रिक टन आहे. पिरॅमिड्सची भव्यता इतकी आहे की, त्यांच्या निर्मितीबद्दल कुतूहल आणि भरपूर प्रश्न आपोआप निर्माण होतात. आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर भव्य दगडांना आणून, त्यापासून पिरॅमिडसारखी भव्य रचना उभी करणे अशक्यप्राय वाटते. अशा पिरॅमिडवर चढणे काही सोपी गोष्ट नाही. ज्या गोष्टीची आपण कल्पना करू शकत नाही ती गोष्ट एका श्वानाने करून दाखवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गिझाच्या ग्रेट पिरॅमिड एक श्वान पक्ष्याचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ गिझाच्या ग्रेट पिरॅमिडवरून उडणाऱ्या पॅराग्लायडरच्या कॅमेऱ्यात शुट झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा