भारतासारख्या देशामध्ये जिथे लोकसंख्येचा आकडा मोठा आहे तिथे चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुलभूत गरज असूनही अपुरी पडत आहे. गर्दीने तुंडूब भरलेल्या बस, रेल्वे आणि मेट्रो हे चित्र सामान्य होत चालले आहे. उन्हाळ्यात शाळेच्या सुट्यांमुळे फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या, विविध धार्मिक स्थळी भेट देणारे यात्रेकरू रेल्वेने मोठ्या संख्येने प्रवास करतात. पण वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार जास्तीच्या गाड्यांचे नियोजन करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. गेल्या दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून हे चित्र वारंवार समोर येत आगे. सध्या पुन्हा एकदा छत्तीसगढ़ एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या गर्दीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी होत असूनते शक्य तितकी जागा व्यापण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. छत्तीसगड एक्स्प्रेस रेल्वेमध्ये अनेक प्रवासी शौचालयाजवळ झोपलेले दर्शवणारा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार
Vande Bharat Express Success or Failure Why are some Vande Bharat lying in the dust
विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस यशस्वी की अयशस्वी? काही वंदे भारत धूळखात का पडून आहेत?
Only 46 percent of the Kalwa Airoli Elevated Project has been completed in seven and a half years
साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्केच काम; भूसंपादन, पुनर्वसन प्रक्रियेतील संथगतीचा फटका
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ

दरवाज्याामध्ये, अगदी शौचालयाजवळ असलेल्या जागेत झोपलेल्या पुरुष व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, त्यात दोन स्त्रिया देखील अशा स्थितीत जागा मिळेल तिथे झोपलेल्या दिलसत आहे. तर काही प्रवासी स्वत: साठी जागा तयार करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना सचिन गुप्ता या एक्स वापरकर्त्याने लिहिले की, “हे दृश्य छत्तीसगड एक्स्प्रेसचे आहे (ट्रेन क्र. 18237). सीट, फ्लोअर, गेट, गॅलरी, बाथरूम…ज्याला जागा सापडली तो तिथेच बसल्या बसल्या झोपी गेला. युरेशियाचे रेल्वे मंत्री, कृपया गरिबांसाठीच्या गाड्यांवर थोडे लक्ष द्या आणि डब्यांची संख्या वाढवा.”

हेही वाचा – “काळ आला होता पण…”, चालकाचे सुटले नियंत्रण अन् भरधाव वेगात थेट दुकानात शिरली बस, दोन महिला….. थरारक अपघाताचा Video Viral

व्हिडिओला ४२,०००पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर X वर संतापाची लाट उसळली. वापरकर्त्यांनी ट्रेनच्या खराब व्यवस्थापनासाठी रेल्वे मंत्रालयाची निंदा केली. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, “हे किती काळ चालू राहणार? रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये स्लीपर कोच का काम करत नाहीत? सामान्य माणूस असा प्रवास करतो आणि आपण स्वप्नांच्या भारताबद्दल बोलतो. आणखी एका युजरने लिहिले की, “रेल्वे गरीबांसाठी होती पण आता ती श्रीमंतांसाठी आहे.”

हेही वाचा – “परिस्थिती सगळं शिकवते….”, भाजी नव्हती म्हणून चिमुकल्याने डब्यात भरली मीठ अन् मिरची, शाळकरी मुलाचा Video Viral

“हा आपला देश असू शकत नाही. गैरसोयीचे खूप कौतुक आहे!”, तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

सोमवारी लखनौ-हरिद्वार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांची गर्दी होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये तिकिट नसलेल्या प्रवाशांनी भरून गेलेले सीटसाठी धडपडत असल्याचे दाखवले आहे.