जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील सफाकडल भागात स्थानिकांनी झेलम नदीत बुडालेल्या ७ वर्षांच्या मुलाला वाचवले. चिमुकला पाण्यावर तरंगताना नागरिकांना दिसला. पाण्याच्या प्रवासासह वाहून चालेल्या या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी एका तरुणाने नदीमध्ये उडी मारली आहे. स्वत:च्या जीवाची बाजी लावून त्या तरुणाने चिमुकल्याला नदीपात्रातून बाहेर काढले. चिमुकल्याला पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यात त्याला यश आले आणि त्याला तात्काळ कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) दिल्याने मोठा अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्सवर X (पूर्वी ट्विटर) स्थानिक वृत्तसंस्थेने शेअर केलेला व्हिडिओमध्ये चिमुकल्याला कसे वाचवण्यात आले हे पाहू शकता. व्हिडीओ शुट करताना एका व्यक्तीचा आवाज ऐकू येतो,”एक लहान मुल पाण्यात वाहून जात आहे” असे कोणीतरी सांगत आहे. छटाबल परिसरातील ही घटना असून व्हिडीओमध्ये रहिवाशांनी आरडाओरडा ऐकू येत आहे. दरम्यान एक धाडसी तरुण लगेच पाण्यात उडी मारतो आणि पाण्यावर तरंगत्या मुलाकडे पोहत गेली. चिमुकल्याला पकडून तो काठवार घेऊन येतो. ते थे आणखी काही लोक थांबले दिसत आहे. लोक मुलाला सीपीआर देण्याची शिफारस करतात कारण तो जिवंत असल्याचे त्यांना दिसते आहे. त्यानंतर त्याला स्थानिक लोक चिमुकल्याल्या रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. मुलाला त्याच्या ठावठिकाणाबद्दल आणि त्याच्या सर्वांगीण आरोग्याबद्दल विचारणा केली जात असल्याचे समजते आहे.

हेही वाचा – कडाक्याच्या उन्हामुळे चक्क AC देखील पेटला! उष्णतेच्या तडक्यामुळे एसी कॉम्प्रेसरला लागली आग, Video Viral

हेही वाचा – “जोर लगा के हईशा!”,भारत अन् चीनच्या सैन्यामध्ये रंगला रस्सी-खेचचा सामना! कोणी केली कोणावर मात? पाहा Viral Video

उत्तर काश्मीरच्या गुंड प्रांग गावातील बांदीपोरा जिल्ह्यातील झेलम नदीत १६ मे रोजी पन्नास वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. काश्मीर रीडरशी बोलताना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम लोन असे या या व्यक्तीचे नाव असून, पिण्याचे पाणी भरताना त्याचा पाय झेलममध्ये घसरल्याने त्याचा मृत्यू झाला.

आणखी एका घटनेत, जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा भागात एक बोट नदीत उलटली, दोन जण बेपत्ता झाले आणि इतर सात जणांना वाचवण्यात यश आले, असे काश्मीर ऑब्झर्व्हरने वृत्त दिले आहे. बेपत्ता झालेले दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.

तत्पूर्वी, एप्रिलमध्ये, झेलम नदीत लहान मुले आणि रहिवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून सातहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक बेपत्ता झाल्याची दुःखद घटना घडली.

काश्मीर ऑब्झर्व्हरने वृत्त दिले आहे की, “१६ एप्रिल रोजी, १५ शाळकरी मुलांसह २६ जणांना घेऊन जाणारी बोट बटवारा, गंडबलजवळ झेलम नदीत उलटली. न्यूज आउटलेटनुसार, बोटीची केबल अचानक तुटली आणि ती झेलम नदीच्या मध्यभागी अजूनही बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खांबावर कोसळली.