सध्या IPL सामान्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सामन्या दरम्यान आणि सामन्यानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये व्हीलचेअरवर बसलेला एका चाहता आणि क्रिकेट स्टार रोहित शर्मा यांच्यातील हृदयस्पर्शी भेट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहेत. रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये व्हिलचेअरवर बसलेल्या या चाहत्याने शर्मा आणि टीममेट सूर्य कुमार यादव यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचे दाखवले आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, एका बॅरीकेडच्या पलीकडे व्हिलचेअरवर एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. सुर्यकुमार त्याच्याबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे. सेल्फी घेतल्यानंतर चाहता सुर्य कुमारचे आभार व्यक्त करतो आणि रोहित शर्माला भेटण्याची विनंती करतो. तो म्हणतो, “थँक्यू दादा, रोहीत शर्माला भेटायचे आहे.” त्यानंतर सुर्य कुमार त्याला आश्वासित करतो की, “मी रोहितला सांगतो.”त्यानंतर रोहित शर्मा त्याच्या चाहत्याला भेटण्यासाठी स्वत: बाहेर येतो आणि त्याला अत्यंत प्रेमाने भेटतो. त्याच्या जर्सीवर सही करतो. आपल्या चाहत्याबरोबर फोटो देखील काढतो.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा