Shocking Accident Video : रस्त्यावर चालताना मोबाईलवर बोलू नका, मोबाईलचा वापर करू नका, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. कारण- या मोबाईलमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आणि त्यात अनेकांचे नाहक बळी गेले. तरीही लोक ऐकत नाहीत. काही वेळा या मोबाईलमुळे तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते. त्यामुळे रस्ता ओलांडताना तरी मोबाईल खिशात ठेवा. आता हाच व्हिडीओ पाहा ना यात एक तरुणी आरामात मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव कार आली अन् पुढे जे काही झालं ते दृश्य अंगाचा थरकाप उडवणारं होतं. हा धडकी भरविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा चूक त्या तरुणीची आहे की कारचालकाची?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी मोबाईलवर बोलता बोलता घाईने रस्ता ओलांडतेय. यावेळी एक भरधाव कार तिच्या अगदी जवळ येऊन थांबते. जर कारचालकाने वेळीच ब्रेक दाबला नसता, तर त्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला असता.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक तरुणी मोबाईलवर बोलत उभी आहे, अचानक ही तरुणी मोबाईलवर बोलता बोलता घाईने रस्ता ओलांडू लागते. यावेळी तिच्या बाजूने एक स्कुटी जाते. त्यानंतर मागून एक भरधाव कार येत असते; पण त्याकडे न लक्ष देता, ती तरुणी मोबाईलच्या तंद्रीत असते. यावेळी कार अगदी तरुणीच्या पायाजवळ येऊन थांबते, तरी कानावरील मोबाईल ती काय बाजूला करीत नाही.
सुदैवाने कारचालकाने कारच्या वेगावर नियंत्रण ठेवीत वेळीच ब्रेक दाबल्यामुळे तरुणीचे प्राण वाचले; अन्यथा तिला मोबाईलमुळे आपला जीव गमवाला लागता असता. या घटनेच्या वेळी कार पायाजवळ येऊन थांबताच तरुणी घाबरते आणि पटकन मागे सरकते. त्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही, दरम्यान, ही घटना रस्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ @roadsafetycontent नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘रस्ता क्रॉस करताना मोबाईल वापरू नका’, असा सल्ला देण्यात आला आहे.
मात्र, आजही तुम्ही पाहाल, तर अनेक लोक स्वत:च्या डोळ्यांसमोर असे अपघात बघूनही रस्त्यावरून चालताना मोबाईलचा वापर करताना दिसतात. पण, हे लक्षात ठेवा की, या तरुणीप्रमाणे प्रत्येक जण असा अपघात टळून वाचू शकत नाही. रस्ते अपघातात कित्येक जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग होऊन बसतात. शक्यतो अशा अपघतांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मोबाईलमध्ये गुंग होण्यापेक्षा स्वत:चा जीव सांभाळण्याला प्राधान्य द्या. रस्त्यावर चालताना शक्यतो मोबाईल बॅग किंवा पँटच्या खिशात ठेवा.