Viral video: हत्तींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हत्तींचा कळप, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओही आपलं लक्ष वेधून घेतात. अशाच हत्तींचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हत्तीचं वजन हे सरासरी पाच ते सहा हजार किलो इतकं असतं. त्यामुळे इतक्या वजनदार प्राण्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड शक्तिची गरज भासेल. परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती वादळासोबत हवेत उडून गेल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंग व्हाल. इतका वजनदार प्राणी हवेत उडालाच कसा? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
आणि हवेच्या भोवऱ्यात हत्ती उडाला!
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोल्हापूरमधला असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, अचानक वारा येतो. जमिनीवर मातीही हवेत फिरताना दिसते. त्यासोबतच जमिनीवर असलेला हा हत्तीही त्या वाऱ्याबरोबर खेचला जातो. हवेत तो त्या वाऱ्यासोबत गरागरा गोलगोल फिरताना दिसतो. तो उलटासुलटाही होतो.सोसाट्याचा वारा, वादळ आल्यावर काय होतं, याची कल्पना तुम्हाला आहेच. अगदी कित्येक वस्तू या वाऱ्याबरोबर उडून जातात. चक्रीवादळात तर घरांच्या छप्परच्या छप्पर उडाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण कधी विचार केला आहे की एखादा वारा अवाढव्य हत्तीलाही घेऊन उडेल. नाही ना? पण या व्हिडीओत ते प्रत्यक्षात दिसून आलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – viral video: जंगलाच्या राजालाच बनवलं मामू, हरणाची हुशारी पाहून तुम्ही देखील कराल सलाम
हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. इतका वजनदार हत्ती हवेत कसा उडाला असा प्रश्न सर्वांनाच पडला. भोवऱ्याचा वेग इतका होता की काही क्षणात हत्ती हवेच्या वेगाबरोबर घिरट्या घालताना दिसत आहे. ३० सेंकदाचा हा व्हिडिओ अनेक जण शेअर करत आहेत. तसेच त्यावर कमेंट्स करत आहेत. दिसणार हत्ती खराखुरा नसून बर्थ पार्टी, प्रमोशन यामध्ये वापरण्यात येणार हवा भरलेला फुगा आहे.