पावसाळा सुरु झाला की, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना दिसू लागतात. मात्र सततची विकासकामे आणि डोंगरात रस्ते बांधणीमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भूस्खलनाच्या घटनांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यांना पाहून लोकांचा थरकाप उडतो.
.
उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुलापासून १६ किमी अंतरावर असलेल्या टनकपूर तवाघाट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या राउती पुलाजवळ सकाळी ०८:३० वाजता भूस्खलन झाले. भूस्खलनात टेकडीचा मोठा खडक तुटून काली नदीत पडला. टेकडीवरून प्रचंड दगड कोसळल्याने आजूबाजूचे वातावरण धुळीने माखले होते तेथे उपस्थित लोकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. दरड कोसळल्याने ढिगारा आणि खड्डे रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि एसएसबी जवानांच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी रस्त्यावर कोणतीही वाहने नव्हती. अपघातानंतर रस्त्यावरील ढिगारा आणि खड्डे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात येत आहेत.

उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये भीषण भूस्खलनाने धारचुलाचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. @KumaonJargan ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेचा एक थरारक व्हिडिओ शेअर केला होता आणि तो व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, “तुम्ही भूस्खलनाच्या थरारक क्षणाचे साक्षीदार आहात, सर्वत्र धूळ आणि माती उडताना दिसत आहे. लोक ओरडताना ऐकू ये आहेत. त्यांच्यापैकी एक जण “किती मोठा पर्वत आहे”, असे उद्गार काढतो.

हेही वाचा –“वंदे भारतमध्ये फ्री शॉवर!”, सर्व सीट झाले ओले, ट्रेनमध्ये झाले पाणीच पाणी, संतापलेल्या प्रवाशांनी शेअर केला Video

हँडलने कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट केला आहे, “पिथौरागढच्या धारचुलामध्ये आणखी एक भूस्खलनाची घटना घडली आहे, ज्यामुळे तवाघाट रस्ता (Tawaghat road.) बंद झाला आहे. ही समस्या केवळ रस्त्यावरील दगड साफ करण्याबाबत नाही; हे उत्तराखंडच्या नाजूक पर्यावरणाची स्थिती दर्शवत आहे. सरकारला सातत्याने आग्रह केला जात आहे: उत्तराखंडचा विकास गुजरात किंवा इतर मैदानी भागासारखा केला जाऊ शकत नाही. येथी टेकड्या एका नव्या दृष्टिकोनाची गरज आहे.”

कॅप्शनमध्ये असेही म्हटले आहे की,”विकास मॉडेल तयार करणे महत्वाचे आहे जे पर्वतांच्या नाजूक स्थितीचा विचार करते, स्थानिक भूवैज्ञानिक दृष्टिकोन विचारात घेते आणि पर्यावरण संरक्षणासह उत्तराखंडची प्रगती करू शकते.” आधीच १४,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या व्हिडिओने सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.

हेही वाचा –“सलाम पोलीस अधिकाऱ्याला!” स्वत:च्या पायातील शूज काढून दिले भरती उमेदवाराला, पाहा सुंदर Video

मोठा दगड तुटून काली नदीत पडला

भूस्खलनाचा व्हिडिओ बनवणारे एसएसबीचे हेड कॉन्स्टेबल रविशंकर यांनी सांगितले की, टनकपूर तवाघाट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या राऊती पुलाजवळ एक मोठा दगड तुटून काली नदीत पडला आहे. या घटनेमुळे स्विंग ब्रिजचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

सकाळी साडेआठ वाजता पिथौरागढमधील रौती पुलाजवळ मोठा दगड कोसळल्याने खळबळ उडाली. दगड पडल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोक, एसएसबीचे जवान आणि नेपाळी चौकीचे जवान जीव वाचवण्यासाठी पळून गेले. ११ व्या कॉर्प्स एसएसबी दिदिहाटचे एसी संदीप केशरी यांनी सांगितले की, राउती पोस्टवर ६ पुरुष आणि ४महिला सैनिक तैनात आहेत. दरड कोसळण्याच्या घटनेमुळे कोणाचीही हानी होण्याची शक्यता नाही.