सध्या सोशल मीडियावर अनेक प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते कधी मनोरंजक असतात तर कधी ते अत्यंत भयानक अंगावर शहारे आणणारे असतात. असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये मगरीने कधी माणसांवर किंवा अन्य प्राण्यांवर हल्ला केल्याचं पाहिलं असेल. मात्र, कधी कुत्र्याने मगरीवर हल्ला केल्याचं पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.

हेही पाहा- दोन्ही पायांनी अपंग पण ‘या’ चिमुरड्याची क्रिकेट खेळायची जिद्द पाहिलीत का? Video होतोय व्हायरल

कारण या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याने मगरीवर हल्ला केला आहे. या भांडणात कुत्र्याने मगरीचे काय हाल केले आहे ते बघून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा मगरीवर अचानक हल्ला करताना दिसत आहे. कुत्रा मगरीचा जबडा तोंडात दाबत तिला चावायला लागतो. मगर स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, पण तिचा प्रयत्न अयशस्वी होतो. मग कुत्रा मगरीला तोंडात पकडून ओढू लागतो, आपल्या जबड्याच मगरीला तसंच पकडून काही अंतरावर नेऊन सोडून दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना कुत्र्याने मगरीसारख्या भयंकर प्राण्यावर हल्ला केल्याच्या घटनेवर विश्वास बसत नाहीये. व्हायरल होत असलेल्या या मगरीच्या आणि कुत्र्याच्या भांडणाचा व्हिडीओ wild_animal_pix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘हा खूप वाईट व्हिडीओ आहे तुम्ही शूटींग करण्याऐवजी ती भांडणं थांबवायला पाहिजे होती’

Story img Loader