सापाची भिती वाटत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. भले काही सर्पमित्र असतात पण ते देखील विषारी सापांना घाबरतात. कारण साप आपणाला कधी दंश करेल हे सांगता येत नाही. शिवाय कोणता साप विषारी आहे आणि कोणता नाही हे ओळखणं तसं कठीण असते. त्यामुळे साप दिसला तरी अनेक लोक पळून जातात एवढी या सापांची दहशत असते.
हेही पाहा- ‘तो’ सिंहाच्या तावडीत सापडला आणि लोक Video करत राहिले; संतप्त नेटकरी म्हणाले, ‘माणुसकी…’
मात्र, सापांनादेखील एका क्षणात गिळून टाकणारे काही वन्यजीव आपणाला पाहायला मिळतात ज्यांची दहशत सापाला वाटते. त्यामध्ये मुंगूस कोंबडी आणि बदकांचा समावेश होतो. सध्या अशाच एका बदकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भलामोठा साप काही क्षणात गिळताना दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका विषारी सापाला बदकाने नूडल्ससारखं गिळल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या सापाला पाहून लोक घाबरतात त्या सापाला बदकाला जिवंत गिळल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय हा बदक दिसताना एवढ्या निरागस दिसत असताना त्याने हे धाडस कसं केलं असेल असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
नूडल्ससारखा गिळला साप –
शांत आणि गोंडस पांढरेशुभ्र दिसणारे बदक पक्ष्यांसारखे दिसतात, परंतु सापासारखे प्राणी हे बदकांचा मुख्य आहार आहे. शिवाय ते सापाला शोधून खातात त्यामुळे दिसायला गोंडस असले तरी सापासाठी बदक म्हणजे मृत्यूचा सापळा असतात यात शंका नाही. व्हिडिओमध्ये हिरव्या गवताच्या मध्यभागी लपलेला साप बदकाला दिसताच त्याने चोचीने सापाला उचललं. मग हळू हळू तोंडात ओढलं, सापाने बदकाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला.
मात्र, बदकाच्या घट्ट पकडीसमोर सापाचं काही चाललं नाही. अखेर बदक सापाला पुर्णपणे गिळून टाकल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतं आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, ‘माझ्या घरात बदक पाळण्याचं एक कारण साप हेच आहे. साप हे बदकांचा आहार असून बदकांना साप घाबरवत, शिवाय बदक साप आसपास दिसला तरी त्याला खातात’