समुद्रामध्ये लहानात लहानापासून ते महाकाय असे मासे सापडतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावरती पाहत असतो. असे अनेक मासे आपण पाहिले असले तरी देखील सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडओमधील मासा तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. हो कारण तो मासा तुम्ही यापुर्वी पाहिलेल्या सर्वं माशांपेक्षा पूर्ण वेगळे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा मासा पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण या माशाच्या शरीराची रचना इतकी विचित्र आहे की तो फुटबॉल आहे की मासा हेच अनेकांना लवकर समजत नाहीये. या दुर्मीळ आणि फूटबॉलसारख्या दिसणाऱ्या माशाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. असून त्याची सध्याजोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील मासा फुटबॉलच्या आकाराचा दिसत आहे.

आणखी पाहा- अती घाई संकटात नेई! औषध म्हणून महिलेने गिळले अ‍ॅपलचे एअरपॉड; एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले चकीत

शिवाय हा मासा दिसायला विचित्र आहे, तसाच तो विषारी देखील आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जर या माशाला स्वत:च्या जीवाला काही धोका होणार असल्याची चाहूल लागताच तो त्याचं शरीर फुग्यासारखं फुगवतो आणि शरीरातून बाणासारखे काटे देखील बाहेर काढतो, त्यामुळे त्याला कोणी हात लावू शकत नाही.

दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर एक व्यक्ती त्या माशाला उचलण्याचा प्रयत्न करतोय पण अंगावर काटे असल्याने तो त्याला उचलू शकत नसल्याचंही व्हिडिओत दिसतं आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती mrosegrech नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या व्हिडीओला जवळपास ३९ मिलियन लोकांनी पाहिलं आहे. तर ९ लाख ३९ हजार लोकांनी त्याला लाइक केलंय. व्हायरल होत असलेल्या या माशाचे नाव पफरफिश असं आहे. हा मासा विषारी असला तरी देखील तो चीन आणि जपानसह अनेक देशांमध्ये खाल्ला जातो. तर या माशाला पफरफिशला पफर्स, टॉडफिश, ब्लोफिशसह इतर अनेक नावांनी ओळखलं जातं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch the viral video of the dangerous puffer fish that looks like a football jap
Show comments