मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने आपला पार चढवायला सुरुवात केली आहे. ऊन आणि गरमीपासून वाचण्यासाठी लोकं बाहेर जाणे टाळून घरीच राहणे पसंत करत आहेत. परंतु महत्त्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते. पण असेही काही लोक आहेत जे उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. थंडीमध्ये अंघोळीपासून पळ काढणारे लोक उन्हाळ्यात मात्र रस्त्यावरही अंघोळ करायला मागे-पुढे पाहत नाही आहेत. याचं उदाहरण तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की दोन व्यक्ती कडक उन्हात स्कुटी घेऊन बाहेर पडतात. त्यांनी आपल्यासोबत पाण्याने भरलेली बादली सुद्धा घेतली आहे. जसे ते एका चौकात पोहोचतात तसा मागे बसलेला मुलगा बादलीतले पाणी आपल्या डोक्यावर ओतायला सुरुवात करतो.

हरवलेल्या बॅगसाठी Air IndiGo ची वेबसाईट केली हॅक; लोक म्हणाले, “वो इंजिनियर है वो…”

RIP म्हणजेच ‘रेस्ट इन पिस’चा उगम नेमका झाला कुठून?; त्यामागील नेमका अर्थ काय?

हा मुलगा स्कुटी चालवणाऱ्या मुलाच्या डोक्यावरही पाणी ओततो, जेणे करून कडक उन्हापासून थोडा दिलासा मिळेल. कडक उन्हापासून वाचण्यासाठी एखाद्याने असं काही तरी करावं हे तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल. फेसबुकवर व्हिडीओ शेअर करणाऱ्या नवजीत परिहारने हा व्हिडीओ राजस्थानमधील जोधपूरचा असल्याचा दावा केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना यूजरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यावेळी मार्चमध्येच उष्णता इतकी वाढली आहे.’ कॅप्शनसोबत युजरने जोधपूरचा हॅशटॅग वापरला आहे. लोक या व्हिडीओला खूप लाइक आणि शेअर करत आहेत. उन्हापासून सुटका करण्यासाठी हा जुगाड लोकांना आवडला असेल, पण प्रत्यक्षात हा जुगाड कोणीही करेल असे वाटत नाही. ३० सेकंदांचा हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch this desi jugaad to escape from summer heat pvp