सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही व्हिडीओ माणसांशी तर काही प्राण्यांशी संबंधित असतात, पण या सगळ्यांमध्ये एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ माणसाशी किंवा वन्यजीवांशी संबंधित नाही. तर हा व्हिडीओ एका ट्रॅक्टरचा आहे. या व्हायरल व्हिडीओमधल्या ट्रॅक्टरने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर काही युजर्सनी ही जादू असल्याचं म्हटलंय. नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एका धान्य मार्केटचे दृश्य पहायला मिळेल. अनेकांनी या मार्केटमध्ये धान्य आणले आहे. या व्हायरल व्हिडीओच्या फ्रेममध्ये दोन ट्रॅक्टर दिसतील. एका ट्रॅक्टरमधून माल उतरवण्यात आला आहे, तर मागे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर धान्य उतरवण्यासाठी उभा करण्यात आला होता. मागच्या ट्रॅक्टरवर कोणीही ड्रायव्हर बसलेला नव्हता, पण अचानक काहीतरी घडतं, जे पाहून सगळेच थक्क होतात.

आणखी वाचा : नवरीला उचलायला गेला अन् सर्व पाहूण्यांसोर धाडकन कोसळला…VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता कोंबड्यावरही चढला ‘Pushpa’ फिवर, ‘Srivalli’ गाण्यावर त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

खरं तर, मागे उभा असलेला ट्रॅक्टर ज्यामध्ये कोणीही बसलेलं नाही, तो आपोआप धावू लागतो. काही वेळ थांबून जेव्हा तो स्वतःहून चालू लागतो, हे दृश्य पाहून थोड्या वेळासाठी वाटू लागतं की, जणू हा ट्रॅक्टरला बोलतोय, “या कडक उन्हात उभा राहून मी खूप तापलोय, तू येतोयस का मी जाऊ?” ट्रॅक्टर फक्त एक किंवा दोन पाऊलंच पुढे सरकत नाही तर तो जवळजवळ उतारावर पोहोचतो. दरम्यान, ट्रॅक्टर आपोआप धावू लागल्याचं पाहून ड्रायव्हर धावत जाऊन त्यावर कंट्रोल करतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ऐन हिमवर्षावात रेस्तरॉंमध्ये जाऊन खाण्याची इच्छा झाली… पण टाळे पाहून त्याने गुडघे टेकले

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २ लाख २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. शेअर करणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही.