सध्याच्या जमान्यात सीसीटीव्हीमुळे अनेक चोऱ्या आणि गुन्ह्यांचा शोध लागताना आपण पाहिला असेल. अशाच एका चोरीचा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोरांकडून वेगवेगळ्याप्रकारे शक्कल लढविली जाते. मात्र, या व्हिडिओतील चोराची कृती पाहून तुमचे चांगलेच मनोरंजन होईल यात शंकाच नाही. इंटरनेटवर आत्तापर्यंत २४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ कितपत खरा आहे किंवा हे सगळे पूर्वनियोजित होते, याबाबत नक्की खात्री देता येत नसली तरी व्हिडिओ तुमचे मनोरंजन करेल एवढे नक्की. या व्हिडिओत एक दुचाकीस्वार रस्त्यात त्याची गाडी दुरूस्त करताना दिसत आहे. दुचाकीस्वार खाली वाकला असताना एक चोर संधी साधून त्याच्या पँटच्या खिशातील पाकीट काढून घेतो. पाकीट मिळाल्यानंतर त्याठिकाणाहून काढता पाय घेण्याच्या बेतात असतानाच आपली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे, ही गोष्ट चोराच्या लक्षात येते. तक्रार झाल्यास आपल्याविरुद्ध कारवाई होईल, या भीतीने चोर आपला इरादा बदलतो आणि पाकीट पुन्हा जमिनीवर फेकून देतो. त्यानंतर दुचाकीस्वाराला तुमचे पाकीट पडले आहे, असे सांगून चोर पाकीट पुन्हा त्याच्या ताब्यात देतो. सीसीटीव्हीत कैद झालेला हा संपूर्ण प्रकार एकुणच मनोरंजक असा आहे. त्यामुळेच या व्हिडिओला नेटिझन्सची पसंती मिळताना दिसत आहे.
Viral video : चोरीचा मामला पण चोर का थांबला ?
इंटरनेटवर आत्तापर्यंत २४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा
![Watch video , thief , CCTV, amazing video, caught on camera , Viral video, pickpocketing, पाकीटमारी, Trending stories, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/08/cctv-thief-main_759.jpg?w=1024)
First published on: 31-08-2016 at 17:34 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch this thief finds out hes been caught on camera what he does next is simply epic