Viral Video : पावसाळ्यात अनेक लोक वर्षविहार करण्यासाठी घराबाहेर पडतात. नदी, तलाव, झरे आणि धबधब्याच्या ठिकाणी जातात पण अशा ठिकाणी ठिकाणी जाताना सुरक्षा जपणे अत्यंत आवश्यक आहे पण अनेकदा आपण सुरक्षेची काळजी न घेता पाण्याच्या ठिकाणी जातो आणि फक्त मजा मस्तीसाठी जीव धोक्यात टाकतो. पावसाळ्यात लोक पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना समोर येतात तरीसुद्धा लोक ऐकत नाही. तुम्ही सुद्धा पाण्याच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात का, मग जाण्यापूर्वी हा व्हिडीओ नक्की पाहा. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक धबधबा दिसेल. धबधब्याचे पाणी हळू हळू वाढताना दिसत आहे. धबधब्याखाली काही माणसं अडकलेली दिसत आहे आणि दुरवरुन एक महिला तिच्या जवळचे लोक अडकल्यामुळे अस्वस्थ झालेली दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की धबधब्याच्या पाण्याचा वेग एवढा जास्त असतो की ते लोक कधीही वाहून वाहून जाऊ शकतात. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “फिरायला जाणार आहात तर हा व्हिडीओ नक्की बघा” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : ‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्यांवरून खाली येत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
ashwinii_.15 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जीवन एकदाच मिळतं.पाठवा तुमच्या मित्राला ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “लोकांना जर आपल्या जीवाची पर्वा असती तर ते असे धोक्याची ठिकाणी जाऊन असा जीवघेणा खेळ केला नसता…. निसर्ग हा आपला मित्र आहे… लोकांना रिलॅस व्हायला, निसर्गरम्य ठिकाणी जाऊन स्टेटस ठेऊन आपल्या माणसांनी बघितला पाहिजे पण तुमच्या याच स्टेटसमुळे एक दिवस तुमच्या फोटो ला हार घालण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही तुमचा स्वतः चा स्टेटस पाहू नाही शकणार..हे ही तितकंच सत्य आहे.. कटू आहे पण सत्य आहे… तुमचं काय मत आहे.. भावांनो बरोबर ना” तर एका युजरने लिहिलेय, “भावांनो निसर्गाच्या सामोरे मानवाचं काही चालत नाही… फिरायला जाताना स्वताची काळजी घ्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “निसर्गाची मजा घ्या पण आपला जीव धोक्यात घालून नको आयुष्य एकदाच मिळतं” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत.