Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. दोन वेगवेगळी व्यक्ती लग्न करुन एक नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि संपूर्ण आयुष्य एकत्र जगण्याचं एकमेकांना वचन देतात. भारतीय संस्कृतीत लग्नाला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात, लग्नानंतर माणसाचं आयुष्य बदलते. नवीन जबाबदारी येतात अशात स्वत:ला त्यात सामावून घेणे खूप जास्त गरजेचे असते. यंदा तुम्हीही लग्न करण्याचा विचार करत आहात का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण सोशल मीडियावर एका तरुणाने एका व्हिडीओच्या माध्यमातून लग्न करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करण्यास सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.लग्न करण्यापूर्वी हा व्हिडीओ नक्की पाहा.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण सांगतो, ” कोणत्याही गोष्टीची तयारी न करता लग्न करणार, मुलबाळं होणार. शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च, कार्यक्रमाला सोनं घ्या, नाणं घ्या, साडी घ्या, कपडे घ्या, लत्ता घ्या, इकडे जायचं तिकडे जायचं, ही अपेक्षा ती अपेक्षा असणार. तुम्हाला खरं सांगतो, लग्न करणं किंवा मुलं बाळं होणं हे चुकीचं नाही पण त्या गोष्टीला जर तुम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार नसाल ना तर तुम्हाला भविष्यात एवढा भयानक दिवस भोगावं लागणार ना मित्रांनो की तुम्हाला वाटेल हे मी काय केलं. कोणत्याही मुलांचं किंवा मुलीचं आयुष्य बदबाद करू नका. सर्वांना मुलं बाळं आहे. तुम्हाला दोन मुलं झाली नाही तर दुनिया बुडणार नाही. काय नसते मित्रांनो, जीव लावायचा असेल तर तुम्ही कुणालाही लावू शकता स्वत:चीच मुले असावी, असे नाही. जर असायचे असतील तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार राहा नाहीतर या कलियुगात लग्न करुन तुमचा हाल होणार .”
हेही वाचा : ‘हरे राम हरे कृष्णा’ म्हणणारा सांता पाहिला का? या सांताक्लॉजची सर्वत्र चर्चा, व्हायरल होतोय व्हिडीओ
maheshmote29 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विग्न” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा, १०१ टक्के खरं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “किती सरळ, साधं आणि सुंदर अर्थ सांगितलस आयुष्याचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “सत्य बोलण्याची ताकद आहे भाऊ तुमच्यात.. उदृत्तम उदाहरण”