Viral video: आजकाल सोशल मीडियावर ‘फ्यूजन डिश’ हा एक नवीन फूड ट्रेंड बनला आहे. लोक रोज नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत, त्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. एखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते आणि ती दुसऱ्या कोणत्या पदार्थासोबत अधिक चविष्ट लागेल याचा विचार होतो. जगभर जे फ्यूजन फूड मिळतेय त्यामागे हाच विचार मुख्य असतो. त्यातून अनेक चवीचे संगम घडलेत. मात्र, काही लोक खूपच विरुद्ध पदार्थ एकत्र करून खातात. दरम्यान एका तरुणानं असाच एक विचित्र पदार्थ बनवला आहे, त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
चहा आणि मोमोज हे लोकांचे आवडते पदार्थ आहेत. दोघांची चवही वेगवेगळी आहे, पण चहामध्ये मोमोज मिसळले तर? नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोमोज चहा बनवताना दिसत आहे. व्यक्ती चहामध्ये अंडयातील बलक देखील टाकतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले आहेत.
नेटकरी संतापले
फूडी काशिफ नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्यक्तीने चहा बनवण्यासाठी मोमोजचा वापर केला आहे. याशिवाय अंडयातील बलक देखील मिसळले आहे. व्यक्तीची अशी कृती पाहून लोक संतप्त झाले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. याआधीही अनेकवेळा खाद्यपदार्थांवर वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत, त्यानंतर लोकांनी आक्षेप घेतला आहे. तुम्हीही पहा हा व्हायरल व्हिडिओ.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत! पवईत पोस्टमनला घेरून हल्ला, धक्कादायक VIDEO व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्यक्तीच्या या कृतीवर सर्वजण आक्षेप घेत आहेत. एका यूजरने या पोस्टवर लिहिले की, ‘आम्ही हे अत्याचार चहासोबत पाहू शकत नाही.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘डेथ टी म्हणा.’ त्याचवेळी दुसर्या युजरने लिहिले की, ‘हे बघायचे बाकी होते.’