भारतीय संघातील महेंद्रसिंह धोनीने चपळ क्षेत्ररक्षण आणि मैदानात चोरटी धाव घेण्याची क्षमता अनेकदा दाखवून दिली आहे. संघातील युवा खेळाडूंना देखील त्याचा हा अंदाज थक्क करुन सोडतो. नुकताच बीसीसीआयने अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यातील शर्यतीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात युवा खेळाडूसोबत धोनी १०० मीटर धावताना दिसत आहे.

वॉर्मअप सेशनदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यावेळी ३६ वर्षांचा धोनी आणि २४ वर्षांच्या हार्दिक पांड्यामध्ये शर्यत लागली. तरूण हार्दिकनं धोनीला हरवण्यासाठी चांगलीच कंबर कसली. धोनीला हरवण्यासाठी हार्दिक आपली पूर्ण शक्ती एकवटून धावला. पण धोनी काही कच्चा लिंबू नव्हता. अष्टपैलू धोनीनं हार्दिकच्या वेगाशी बरोबरी करत त्यानं बाजी मारली. तेव्हा धोनीचा हा फिटनेस पाहून हार्दिकही थक्क झाला.

Story img Loader