भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा एकदा रंगली आहे. धोनीनं निवृत्ती घेण्याची वेळ आता आली आहे असं अनेकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे जाणीवपूर्वक धोनीला लक्ष्य केलं जात आहे असंही मत असणारे अनेकजण आहेत. थोडक्यात काय तर धोनीच्या चाहत्यांमध्ये निवृत्तीच्या चर्चेमुळे थोडं निराशेचं वातावरण आहे.

Indigo Airlines Controversy : ‘माझ्या बॉसलाही तुडवा’, इंडिगोवरची उपरोधिक टीका सोशल मीडियावर व्हायरल

हे गंभीर वातावरण थोडसं निवळण्यासाठी ‘क्रिकेटशॉट’च्या इन्स्टाग्राम पेजवरून धोनीच्या चाहत्यांसाठी खास व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. मैदानात चौकार, षटकार मारून धावांचा डोंगर रचणाऱ्या धोनीला आतापर्यंत अनेकांनी पाहिलं असेल, पण त्याचं ‘नृत्य’कौशल्य मात्र अजूनही त्याच्या चाहत्यांसमोर आलं नाही, तेव्हा ‘क्रिकेटशॉट’ने अपलोड केलेला हा व्हिडिओ धोनीच्या चाहत्यांना ‘खूप’च आवडला. बॉलिवूडमधल्या एका गाण्यावर धोनी डान्स करण्याचा प्रयत्न करत होता, पण बिचाऱ्या धोनीला काही तो जमला नाही. डान्सचं तोडकं मोडकं कौशल्य वापरून धोनीनं पत्नी साक्षीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो भाबडा प्रयत्न पाहून साक्षीला मात्र हसू आवरलं नाही.

वडील झोपेत असताना ९ वर्षांच्या मुलीने फोनवरून बुक केली डिस्नेलॅण्डची ट्रीप

निवृत्तीच्या चर्चेवरून वातावरण गंभीर असताना धोनीचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांच्यासाठी ‘मूड बूस्टर’ ठरला असणार हे नक्की!

Story img Loader