असे म्हणतात की, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आपल्या मुलासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करणारा कोणी नाही. कदाचित यामुळेच आईचा दर्जा देवापेक्षा वरचा मानला जातो. आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते, मग परिस्थिती कोणतीही असो. ‘देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली आहे’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक आई तिच्या नोकरीसह आपल्या मुलाची कशी काळजी घेते हे व्हिडिओमध्ये पाहू शकत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलासह घरोघरी जाऊन फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधला असल्याचं सांगितले जात आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या महिलेचं कौतुक केले आहे.

हेही वाचा –मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral

या व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला एका इन्फ्ल्युएन्सरला तिच्या आयुष्याशी संबंधित संघर्षाची कहाणी सांगत आहे. “मी हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थी आहे. माझ्या लग्नानंतर, मला माझ्या मुलाला सांभाळता काम येईल अशी नोकरी शोधण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मग मला वाटले, माझ्याकडे एक बाईक आहे आणि मी माझ्या मुलाला माझ्याबरोबर मी कामावर घेऊन जाऊ शकते, म्हणून मी हे काम निवडले,” तिने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @vishvid नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो खूप पाहिला जात आहे आणि खूप लाइक केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या निर्धाराची आणि काम सांभाळण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. काहींनी सुरक्षेची चिंता व्यक्त केली आणि तिने किंवा तिच्या मुलाने हेल्मेट घातलेले नव्हते.

हेही वाचा – “जीवाची पर्वाच नाही!”, भररस्त्यात धावत्या दुचाकीवर अल्पवयीन मुलासह तरुणांचा जीवघेणा स्टंट, Video Viral

व्हिडिओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की, “जगातील सर्वात मोठी योद्धा एक आई आहे”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “मी माझ्या मुलाशिवाय कामावर जाणार नाही, हे फक्त आईच सांगू शकते.” तिसऱ्या युजरने लिहिले, “तुम्हाला सलाम.”

“कृपया तिला हेल्मेट द्या आणि लहान मुलासाठी देखील,” अशी टिप्पणी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने केली.

हा व्हिडीओ एका आईची चिकाटी आणि तिची नोकरी आणि कुटुंबाचा समतोल राखण्यासाठी दृढनिश्चय दर्शवते आणि तिच्या समर्पणाने अनेकांना प्रेरणा देते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video of zomato woman delivery agent riding bike with her child goes viral internet reacts snk