Viral Video : हल्ली लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे व्यसन दिसून येत आहे. इन्स्टाग्राम, फेसबूक, एक्स सारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा अतिवापर करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हटके व्हिडीओ किंवा रील शेअर करण्यासाठी लोक वाट्टेल ते करतात. अनेकदा जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण भर रस्त्यावर रील बनवताना दिसत आहे. रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या ये जा करत आहे पण हा तरुण मात्र रील बनवण्यात व्यस्त आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. (Watch video Young Mans Shocking Reaction as Police Vehicle Suddenly Appears While making reels on a road by Wearing Headphones)
काय होत आहे व्हायरल?
हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने ये जा करताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्ही नीट पाहाल तर तुम्हाला एक तरुण दिसेल, ज्याने दोन रस्त्याच्या मध्यभागी ट्रायपॉडवर मोबाईल होल्ड केला आहे आणि तो भररस्त्यावर रील बनवताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या कानात हेडफोन आहे आणि डान्स करताना दिसत आहे, शाहरूख खानची आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. अचानक त्याच्याजवळ पोलीसाची गाडी येते आणि व्हिडिओ येथेच बंद होतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Ghar Ke Kalesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रिअरल लाइफ मूर्ख रस्त्यावर रील बनवताना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लोकांना एवढा आत्मविश्वास येतो कुठून?” तर एका युजरने लिहिलेय, “पोलिसांना पाहून बरं वाटलं” आणखी एका युजरने लिहिलेय, “जुन्या पिढीत असे लोक मानसिक रुग्णालयात असायचे.” एक युजर लिहितो, “हे लोक कधी सुधरणार?” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.