Viral Video : अनेकजण गरजेपोटी मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतर करत आहे पण गाव हे गाव असते, असं म्हणतात, ते खरं आहे. गावाकडची जीवनशैली आजही अनेकांना प्रेरीत करते. गावातील जीवनशैली दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. असाच एक गावातील मुलांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गावातल्या मुलांनी चिखलाची केली घसरगुंडी आहे आणि नदीत पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला वॉटर पार्कची आठवण येऊ शकते. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चार पाच गावकरी लहान मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहे. त्यांनी चक्क चिखलाची घसरगुंडी केली आहे आणि या घसरगुंडीवरुन ते घसरत थेट नदीत उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून गावकऱ्यांचा नाद खुळा! असे तुम्ही म्हणाल.

हेही वाचा : “पहिल्यांदा मी बॅटींग करणार” दोन मित्रांमध्ये जुंपली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

vrindavan_kids या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,”Village water park”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “जुन्या आठवणीत रमलो” तर एका युजरने लिहिले आहे, “हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही” आणखी एका युजरने लिहिले आहे, “गावातील जीवन खूप सुंदर असते, अशी मजा शहरात येणार नाही”

Story img Loader