Viral Video: सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे की, जिथे चांगल्या कामगिरीने लोक प्रसिद्ध होतात; तर वाईट गोष्टीने ट्रोलही होतात. काही जण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतात; तर अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी विचित्र स्टंटचा उपयोग करतात. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक व्यक्ती स्वतःचे अनोखे कौशल्य दाखवते आहे. अनेक अशक्य गोष्टी शक्य करण्याची हिंमत या व्यक्तीमध्ये आहे, असे तुम्ही हा व्हिडीओ पाहून नक्कीच म्हणाल.
हा व्हिडीओ चीनमधील आहे. ही व्यक्ती काचेच्या बाटल्यांवर शिलाई मशीन ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला ही व्यक्ती एक छोटी लादी ठेवते. त्यानंतर त्यावर दोन काचेच्या बाटल्या व मग आणखी एक काचेची बाटली ठेवून थर लावते आणि त्यावर शिलाई मशीन ठेवण्याचा प्रयत्न करते. अनेक वेळा प्रयत्न केल्यावर काही काचेच्या बाटल्या फुटतात. पण, व्यक्ती तरीही पुन्हा पुन्हा प्रयन्त करताना दिसते आहे. काचेच्या बाटल्यांवर शिलाई मशीन ठेवण्यात व्यक्ती यशस्वी झाली का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…हत्तीलाही आवरला नाही आंब्याचा मोह; मानवी वस्तीकडे घेतली धाव; सोंडेने झाड हलवले अन्… पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एका महिलेच्या मदतीने काचेच्या बाटल्यांवर शिलाई मशीन ठेवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. ती महिला मशीनची कडा काचेच्या बाटलीवर ठेवून समतोल राखण्यास सुरुवात करते. अनेक वेळा त्यांचा प्रयत्न वाया जातो. पण, शेवटी मशीनचे टोक किंवा कडा बाटलीवर ठेवून महिला आणि ती व्यक्ती काचेच्या बाटल्यांवर जुनी शिलाई मशीन ठेवण्यात यशस्वी होतात; जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आणि हे खरेच घडलेय का, असा प्रश्नही तुम्ही स्वतःला विचाराल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @art_viral या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. चीनच्या शेंडोंग प्रांतातील वांग येकुन हे त्यांच्या मनमोहक व्हिडीओंमुळे त्यांच्या देशात ऑनलाइन स्टार बनले आहेत. ही व्यक्ती अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते आणि अनेकांना चकित करून सोडते. ही व्यक्ती या गोष्टी करण्यासाठी तासन् तास काम करते, पुन्हा पुन्हा प्रयत्न करते आणि त्यातून साधलेली कमाल तयार केलेल्या व्हिडीओतून दाखवून देत असते. पण, नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. पण, अनेक जण कमेंट्समधून त्या व्यक्तीच्या कौशल्याला दाद देताना दिसून आले आहेत.