कधी कोणाचा काळ येईल याचा काही नेम नाही. रोज रस्त्यावर कित्येक थरारक अपघात होत असतात ज्यामध्ये कित्येकांचा नाहक बळी जातो. अनेकदा दुचाकी स्वार मोठ्या वाहनाचा अपघात होत असतात ज्यामध्ये दुचाकी स्वाराने हेल्मेट परिधान करत नाही म्हणून त्यांचा जीव जातो. सोशल मीडियावर अशा अपघातांच्या कित्येक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वाहतूक पोलिस वारंवार हेल्मेट परिधान करण्याची सुचना करूनही अनेक लोक सर्रास पण हेल्मेट शिवाय दुचाकी चालवताना दिसतात. हेल्मेट वापरल्यामुळे अनेकदा लोकांचा जीव वाचला आहे. सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देत आहे.
इंस्टाग्रामवर roadsafetycontent नावाच्या खात्यावर कार आणि दुचाकी स्वाराच्या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एका दुचाकीस्वार कारच्या चाकाखाली सापडला आहे. दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून कारचे चाक जाताना दिसत आहे पण सुदैवाने त्याने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा जीव वाचतो. कार डोक्यावरून पुढे गेल्यानंतर तरुण पुन्हा उठून बसलेला दिसत आहे. अपघात पाहिल्यानंतर उपस्थितांना देखील धक्का बसला आहे पण हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचल्यानंतर तातडीने लोक त्याच्या मदतीसाठी धावले आहेत. हेल्मेट का वापरवे हे दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – नऊवारी लयभारी! जर्मन महिलेचा मराठमोळा अंदाज; कपाळी कुंकू अन् हातात टाळ घेऊन करतेय दहा वर्षांपासून आषाढी वारी
हेही वाचा –चिकन लेगपीससाठी लग्नात राडा! पाहुण्यांनी लाथा-बुक्यांनी केली एकमेकांना मारहाण, Video Viral
व्हिडीओमध्ये शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “हेल्मेट दंड वाचवण्यासाठी नाही तर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी वापरा.” पोलिसांनी पकडू नये किंवा दंड भरावा लागू नये या भितीमुळे अनेक लोक हेल्मेट वापरताना दिसतात. जीवा पेक्षा अनमोल काही नाही. एकदा जीव गेला तर परत येत नाही. दंड चुकवण्यासाठी हेल्मेट वापरण्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट वापरले पाहिजे.
व्हायरल व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.