स्वयंपाकघरात काम करताना कधी स्टोव्ह बंद झाला , कधी गॅस बर्नरमध्ये कचरा अडकला म्हणून, तर कधी मिक्सर बंद झाला तर आईची तारांबळ उडते. घरच्या घरी या समस्येचं निराकरण झालं तर बरं, नाही तर दुरुस्तीसाठी स्टोव्हवाल्याचे दुकान उघडेपर्यंत वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नसतो. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीची शेगडी दुरुस्तीची अप्रतिम शैली पाहून सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये जांभळ्या रंगाचे शर्ट घालून काळा टिक्का लावून एक व्यक्ती शेगडी दुरुस्त करताना दिसते आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती शेगडी दुरुस्त करण्याचे कठीण काम अतिशय जलद गतीने करीत आहे; जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. त्यामुळेच हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरतो आहे. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा :
व्यक्ती शेगडी दुरुस्तीची अप्रतिम शैली दाखवतो आहे. सगळ्यात पहिला व्यक्ती हवेत हातोडी उडवून पुन्हा हातात घेतो आणि गॅस बर्नरवर जोरात मारतो आणि अनोख्या पद्धतीत शेगडीपासून गॅस बर्नर वेगळं करतो. त्यानंतर दुरुस्तीची काही उपकरणे वापरत शेगडी दुरुस्त करण्यास सुरुवात करतो. शेगडी दुरुस्त करताना त्याची गती, हावभाव पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल एवढं नक्की.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chotutufan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याशिवाय, या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे तेथे शेगडी, स्टोव्ह आणि प्रेशर कुकर दुरुस्तीचे इतर व्हिडीओ आहेत. यापैकी अनेक व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी कूकर दुरुस्त करतानाच व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, आता शेगडी दुरुस्त करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्याला नेटकरी पसंती दाखवताना दिसत आहेत