लहान मुलं आपल्या आईवडिलांच्या लग्नाचे फोटो पाहून नेहमी असा प्रश्न विचारता, त्यांचा फोटो यात का नाही? आई-वडिलांच्या लग्नामध्ये का दिसत नाही? किंवा ते कुठे होते. या प्रश्नाचे उत्तर आपल्या सोयीने देतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक लहान मुलगा आपल्या आईच्या लग्नात उपस्थित आहे. व्हिडीओमध्ये तो आपल्या आई आणि नवीन वडिलांसाठी त्याच्या भावना व्यक्त करतो. यावेळी तो असे काही बोलतो जे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. इतक्या कमी वयात कोणताही मुलगा असे काही बोलू शकतो, अशी आशा कोणीही केली नसेल.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, खुर्चीवर नवरा-नवरी बसलेले आहेत. त्यांच्यासमोर एक टेबल ठेवला आहे. मुलगा त्यांच्यासमोर उभा आहे. मुलाने एका हातात माइक आणि एका हातात पेपर पकडला आहे. तो बोलत,”माझे नाव जॉर्डन आहे. मी नवरीचा मुलगा आहे. नवरदेवाचा बेस्ट मॅन आहे. आज अधिकृतपणे मी त्याचा सावत्र मुलगा झालो आहे. मी आज विनीच्या(नवरदेवाच्या) बाजूने उभा राहून, स्वत:ला नशीबवान समजत आहे, तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्याशी लग्न करत आहे आणि प्रत्यक्षात ती माझ्या आयुष्यातील पहिले प्रेम आहे. ”

हेही वाचा – लग्नापत्रिकेत नवरा-नवरीच्या नावासमोर लिहिली IIT डिग्री; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

आईसोबत लग्न करण्यासाठी लेकाने सावत्र वडिलांचे मानले आभार
तो पुढे म्हणाला, ‘जसे की इथल्या प्रत्येकाला आधीच माहित आहे की विनीला चांगली मुलगी मिळाली आहे. हे अत्यंत दुर्मिळ आहे. त्याने पूर्ण बक्षीस जिंकले आहे त्यासाठी कोणतेही रिसर्च केले नाही. पहिले म्हणजे आपण इथे आहोत. त्यांनी मला आईसोबत नेहमी पाहिले आहे. एकावर एक स्टिकर फ्रि असल्यासारखे. गांभीर्याने सांगायचे झाले तर,विनीने माझ्या आई आणि मला एका पॅकेज डिल प्रमाणे पाहिले आहे. विनी माझ्या आईबरोबर लग्न करण्यासाठी आभारी आहे. तुम्ही तो हरवेलेला तुकडा आहात ज्याची माझ्या आईला गरज होती आणि ते तिला माहित नव्हते. आईने केवळ स्वत:साठी नव्हे तर आपल्यासाठी विनीला निवडल्याबदद्ल धन्यवाद.”

हेही वाचा – ‘‘चॉकलेट परत दे!”, सही दिल्यानंतर धोनीने चाहत्याकडे परत मागितले चॉकलेट; व्हायरल होतोय मजेशीर व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर goodnews_movement नावाच्या अंकाउवर शेअर केला आहे. लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. तसेच कमेंच करत प्रतिक्रिया दिल्या आहे. लोकांनी मुलांच्या समजुतदारपणाचे कौतूक केले आहे.