Rare White Snake Viral Video : मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असतानाच हिमाचलमध्ये एक सफेद रंगाचा किंग कोब्रा आढळला आहे. या दुर्मिळ सापाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. लोकांनी हा साप पाहिल्यावर किंग कोब्रा असल्याचं समोर आलं. परंतु, काही सर्पमित्रांनी या सापाला पाहिल्यानंतर हा अल्बिनो जातीचा साप असल्याची माहिती समोर आली. हा साप क्वचितच जंगलात दिसतो. एका रिपोर्टनुसार, साप ५ फूट लांब होता आणि हा साप हिमाचलमधील चंबा जिल्ह्यात आढळला. याआधी पुण्यात अशा प्रकारचा अल्बिनो साप दिसला होता. हा आगळावेगळा साप आढळ्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच दुसरीकडे साप पाहण्याची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती.

सफेद रंगाचा साप इंटरनेटवर झाला व्हायरल

एल्बिनो साप क्वचितच दिसतात आणि अशा सापांची दुर्मिळ प्रजातीच्या सापांमध्ये नोंद करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, सफेद रंगाचा साप जमिनीवरून सरपटत जाऊन एका झाडाच्या पायथ्याशी जातो. दुधासारखा सफेद असलेल्या या सापाची थरारक दृष्ये कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या सापाचा व्हिडीओ @BadkaHimachali नावाच्या अकाऊंटवरून ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, दुर्मिळ एल्बिनो सांप. व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील असल्याचं बोललं जात आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा

इथे पाहा सफेद रंगाच्या सापाचा व्हिडीओ

एल्बिनो साप काय आहे?

एल्बिनो साप अशाप्रकारचा साप आहे, जो आनुवंशिकतेच्या माध्यमातून जन्माला येतो. याला एल्बिनिजम असं म्हटलं जातं. म्हणजेच शरीर आणि डोळ्यांत रंजकतेची कमी असणं. यामुळे या सापांचा रंग सफेद असल्याचं कळतं. तसंच या सापांमध्ये विशिष्ट रंगाची कमी असू शकतो. जसं की, एखादा साप सामान्यत: पिवळा, सफेद आणि लाल असतो. तो फक्त पिवळा आणि सफेदच असू शकतो. एल्बिनिजमच्या कारणामुळे सापांच्या डोळ्यांचा रंग लाल होतो आणि त्यांची दृष्टी कमकुवत होते.

Story img Loader