Wedding guests engage in battle to grab for non-veg food : आपल्याकडे लग्न-संभारंभांना खूप महत्त्व दिले जाते.लग्नातील प्रत्येक विधीला खूप महत्त्व आहे. वधू-वर यांना आशिर्वाद देण्यासाठी नातेवाईक आणि आप्तस्वकियांना आवर्जून बोलावले जाते. पण सत्य हे आहे की,बहुतेक लोक लग्नामध्ये फक्त जेवण करण्यासाठी येतात. लग्नातील पंचपक्नावन खाण्याचा आनंद घेण्यासाठी सर्व पाहूणे कधी एकदा नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता पडतील याची वाट पाहत असतात. लग्नातील जेवण तसे सर्वांनाच आवडते पण जेव्हा लग्नामध्ये मासंहारी जेवण मिळत असेल तर शाकाहारी जेवणाकडे ढुंकूनही बघत नाही. हेच चित्र नुकतचं एका लग्नात पाहायला मिळाले.
एका भव्य लग्नात मांसाहारी जेवण घेण्यासाठी लग्नात आलेल्या पाहुण्यांची एकच जुंबड उडाली होती. लोक धक्काबपुकी करत मासंहारी जेवण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओने इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.व्हिडीओमध्ये लग्नात आलेले पाहुणे मांसाहारी खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी करताना एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसतात.
हेही वाचा – ऐकावे ते नवलच! कानातील मळ विकून ही बाई कमावतेय रोजचे ९,००० रुपये! विचित्र व्यवसाय पाहून चक्रावले नेटकरी
व्हिडीओमध्ये दिसते की, पाहुणे ताट धरून मांसहारी जेवणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही जण मांसहारी पदार्थ घेण्यासाठी काउंटरवर तुटून पडत आहेत. याउलट,शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल पूर्णपणे रिकामे आहेत, वेटर्स आळशीपणे उभे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत आहे.
हा व्हिडिओ एका वापरकर्त्याने Instagram वर @swagsedoctorofficial या वापरकर्त्याच्या नावाने पोस्ट केला होता ज्याने लग्नात व्हेज आणि नॉनव्हेज स्टॉल्समधील फरक अधोरेखित केला होता. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “तुम्हाला लग्नात काय खायला आवडेल?”
व्हिडिओला Instagram वर ६,००,०००हून अधिक पसंती मिळाल्या आहेत.