सोशल मीडिया (Socail Media) प्लॅटफॉर्मवर सापांचे असे अनेक व्हिडीओ (snake video)आहेत, जे आश्चर्यचकित करणारे आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर क्षणभर विश्वास बसणार नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस अॅनाकोंडासमोर मृत उंदराला लटकवतो. आपल्या भक्ष्याला पाहताच अॅनाकोंडा क्षणार्धात त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला पकडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) झाला आहे.
चार दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पिवळ्या अॅनाकोंडासमोर मृत उंदराला लटकवतो. अॅनाकोंडाला उंदीर दिसताच तो हल्ला करतो आणि त्याला पकडतो. व्हिडीओ शेअर करताना त्या व्यक्तीने यलो अॅनाकोंडाचा वेग १ ते १० दरम्यान रेट करण्यास सांगितले आहे.
(हे ही वाचा: मुलाने आणली इंजिनिअर सून, सासूने सांगितलं जेवण बनवायला आणि मग…; बघा हा मजेशीर Viral Video)
(हे ही वाचा: रेल्वे रुळावर अचानक आला हत्ती आणि…; बघा Viral Video)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर Theblackivory_Reptiles नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवरून सापाचे अनेक वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हिडीओला ३११ हजारांहून अधिक लोकांनी बघितलं आहे.