हॉटेलमध्ये जाऊन जेवायला प्रत्येकालाचा आवडतं. अनेक हॉटेलमध्ये प्रवेश करताच ग्राहकांचे विशेष स्वागत केले जाते. पण जगात एक असे एक हॉटेल आहे जिथे ग्राहक प्रवेश करताच त्यांना कानाखाली मारले जाते. कानाखाली मारण्यामुळे हे हॉटेल जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण चकित झाला असून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. या हॉटेलमध्ये लोक मार खाण्यासाठी पैसे देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या हॉटेलचे नाव शचिहोकोया-या आहे. हे जपानमधील नागोया येथे आहे. असे म्हणतात की या रेस्टॉरंटमध्ये मार खाण्यासाठी लोक पैसेही देतात. गालावर मारण्यासाठी लोक ३०० जपानी येन म्हणजेच १६९ रुपये खर्च करतात. हॉटेलमध्ये प्रवेश करताच लोकांना कानाखाली मारली जात असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही कानाखाली इतकी जोरदार आहे की लोक स्वतःवर नियंत्रण गमवत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे रेस्टॉरंट २०१२ मध्ये उघडण्यात आले होते. काही काळानंतर ते बंद होण्याच्या मार्गावर होते, पण नंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि येथे लोकांची मोठी गर्दी होऊ लागली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हरणावर हल्ला करण्यासाठी मगरीने डाव साधला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO होतोय Viral

व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘लोकांना एवढं का मारलं जात आहे?’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘जर मला याची किंमत मोजावी लागली तर मी इथे कधीच जाणार नाही.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘ही लाजिरवाणी बाब आहे.’