प्राण्यांकडूनही कधी कधी बरंच काही शिकण्यासारखं असतं. भलेही मानव आणि प्राणी यांच्यातला संघर्ष कायम असला तरी कधीकधी प्राण्याचं वागणं हे खरंच अनुकरण करण्यासारखं असतं. केरळमधला हा व्हिडिओच पाहा ना.. केरळ, पश्चिम बंगाल भागातील जंगलात हत्ती मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे हत्ती आणि मानवामध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळतात. पण, आपल्या पिल्लाला माणसांनी वाचवण्यासाठी धडपड केलेली पाहून हत्तीच्या कळपानं चक्क सोंड उंचावून एकत्र गावकऱ्यांना अभिवादन केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यूट्युबवर महिन्याला कमावतो ७ लाख रुपये

VIDEO : ताडोबातील वाघाने मजूरांच्या जेवणाचा डबा पळवला

हत्तीच्या कळपातील एक लहानसं पिल्लू नदी पार करताना दलदलीत अडकलं. कळपानं या पिल्लाला रात्रभर वाचवण्याचा प्रयत्न केला पण पिल्लाला बाहेर काढण्यात त्यांना यश आलं नाही. दुसऱ्या दिवशी वनविभागाचे अधिकारी तेथे आले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं तासभर खटपट करून त्यांनी या पिल्लाला बाहेर काढलं. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी केलेली खटपट पाहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हत्तीच्या कळपाने सोंड वर उंचावून चित्कार केला आणि ते जंगलात निघून गेले. मुक्या प्राण्यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता पाहून गावकरीही हरखून गेले. हा व्हिडिओ सध्या युट्यूब, फेसबुकवर चांगलाच गाजतोय. आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Story img Loader